वर्धा-नागपूर रोडवर भीषण अपघात, ट्र्कला ट्रॅव्हल्सची धडक, तिघांचा मृत्यू, 25 जखमी
नागपूर अपघात बातम्या : नागपूर वर्धा रोडवर असलेल्या जुनापाणी गावाजवळ भीषण अपघाताची (Nagpur Accident) घटना घडली आहे. ज्यामध्ये ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. आज (30 डिसेंबर) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हा अपघात (Nagpur Accident News) झाला आहे. अत्यंत तीव्र गतीने जाणाऱ्या बसने पाठीमागून ट्रकला धडक दिली. या धडकेत बसच्या समोरील भाग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील प्रक्रिया पूर्ण केलीय. तर जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय, तसेच काहींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Nagpur Accident News)
Nagpur Accident News : दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू, तर 25 प्रवासी गंभीर ते किरकोळ जखमी
दरम्यान, प्राथमिक माहिती नुसार नागपूरकडून येणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सने पुढे जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि ट्रॅव्हल्सचा पुढील भाग अक्षरशः चकणाचूर झालाय. तर या दुर्घटनेत 3 जणांचा जागीच मृत्यू, तर 25 प्रवासी गंभीर ते किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात अतिवेग, चालकाला डुलकी किंवा दृष्टीआड ट्रक उभा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून तपासानंतर अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
Dharashiv News : पवनचक्कीच्या वाहनांनी दोघांना चिरडले, संतप्त जमावाने वाहन पेटवली
धाराशिवच्या वाशी तालुक्यातील कडकनाथ वाडी येथे पवनचक्कीच्या वाहनाने रात्री दोघांना चिरडल्याची घटना घडलीय. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहन पेटवून दिलंय. चांद शेख आणि वसंत जगताप अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. पवनचक्कीसाठी वाळू सिमेंट खड्याच मिश्रण वाहून घेणाऱ्या भरदार वाहनाने धडक दिल्याने यांचा मृत्यू झाला. या भागातून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास नागरिकांनी यापूर्वी विरोध केला होता त्यानंतर ही वाहतूक सुरू होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहन पेटवून दिली.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.