नवाब मलिकांना राहुल नार्वेकरांची तगडी फाईट, दोघांच्या कुटुंबात तीन-तीन उमेदवार
नवाब मलिक आणि राहुल नार्वेकर: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कुटुंबातील प्रत्येकी तीन सदस्य निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांचे कुटुंब महापालिका निवडणूक लढवणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण डॉ. सईदा खान, आणि कप्तान मलिक यांच्या सून बुशरा नदीम मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Rahul Narwekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात 3 तिकीटं
दुसरीकडे, भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तिन्ही सदस्य निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर, आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर–नार्वेकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत हे तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. भाजपने नुकत्याच बैठकीत महापालिका निवडणुकीत आमदार–खासदारांच्या मुलांना किंवा पत्नींना उमेदवारी न देण्याचा पवित्रा जाहीर केला होता. मात्र, नार्वेकर कुटुंबाला तिकीट मिळाल्यामुळे पक्षाच्या अधिकृत धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला गती मिळाली असून, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूरही ऐकू येत आहे.
Nawab Malik and Rahul Narwekar: नवाब मलिकांना राहुल नार्वेकरांची तगडी फाईट
मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आज असून, मतदान 15 जानेवारी रोजी आणि निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत. गेल्या काही वर्षांत महापालिकांवर प्रशासकीय कारभार चालू असल्याने, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. एकाच घरातील तीन-तीन उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे, नवाब मलिक आणि राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील ही तगडी फाईट संपूर्ण मुंबईत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. आता पाहणे महत्वाचे आहे की, या घराणेशाहीने पक्षासाठी फायदेशीर ठरेल की कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढवेल.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.