विधानसभेला चंद्रकांत पाटलांना नडले; पक्षाने डावलून दिलं लहू बालवाडकरला तिकीट, अमोल बालवडकर अजित
पुणे: पुण्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषांगाने घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याचबरोबर त्यांच्या जागेवर लहू बालवडकर (Lahu Balwadkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत थेट देवेंद्र फडणवीसांकडे गाऱ्हाण मांडलं होतं आणि कोथरूडमधून आमदारकीसाठी उमेदवारी देण्यासाठी हट्ट धरला होता. त्यानंतर आता अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांची उमेदवारी भाजपनेच नाकारली आहे. त्यामुळे लहू बालवडकर यांची लॉटरी लागली आहे.
तर भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर आता अमोल बालवडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली होती. एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं, त्यानंतर भाजपाने माझ्यासोबत दगा फटका केला. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं, मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली. मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता, तो शब्द पाळला गेला नाही. यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान आहे माझं नाही. याचं नुकसान माझ्यापेक्षा जास्त भाजपाला होणार आहे, याचा फटका भाजपा बसेल असंही अमोल बालवडकर यांनी म्हटलं आहे.
Amol Balwadkar : अमोल बालवडकर अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत
भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर अमोल बालवडकर अजित पवारांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे. अमोल बालवडकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेणार असल्याची माहिती आहे. विधानसभेत चंद्रकांत पाटील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते.
Amol Balwadkar : स्नेहमेळावा घेत मोठं शक्तिप्रदर्शन केलं होतं…
पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुसगाव आणि म्हाळुंगे एवढा मोठा परिसर मिळून बनलेल्या प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक असलेल्या अमोल बालवडकर यांनी स्नेहमेळावा घेत मोठं शक्तिप्रदर्शन देखील केलं होतं. महापालिकांच्या निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक मतदार संख्या म्हणजे सुमारे 1 लाख 56 हजार मतदार संख्या असलेल्या या प्रभागाला मिनी विधानसभा म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे इथे निवडणूक लढविणाऱ्या भल्याभल्यांची दमछाक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आणि सामान्य जनतेनी टाकलेल्या विश्वासावर आपण राज्यातील सर्वाधिक मतं घेऊन विजयी होणारा उमेदवार असू असा विश्वास, यावेळी बालवडकर यांनी व्यक्त केला होता. मात्र भाजपने ऐनवेळी भाजपने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.