मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याला मुंबई महापालिकेचं तिकीट, तर नणंदबाईही निवडणुकीच्या रिंगणात
Tejaswini Lonari Husband Samadhan Sarvankar Will BMC Election: सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची (Mahapalika Election 2026) रणधुमाळी पाहायला मिळतेय. शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत फुटीनंतरची पहिली निवडणूक आहे, त्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. यंदाच्या निवडणुकीत फार वेगळी समीकरणं पाहायला मिळत आहेत. तसेच, आयाराम दिलेल्या प्राधान्यामुळे निष्ठावतांची नाराजीही उफाळून आली आहे. तब्बल आठ वर्षांनी होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Mahanagar Palika Election 2026) सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात अनेक सिनेइंडस्ट्रीतले चेहेरेही पाहायला मिळतायत. काहीजण थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, तर काहीजण प्रचार रॅलींमध्ये दिसणार आहेत. अशातच मराठी अभिनेत्रीच्या (Marathi Actress) नवऱ्यालाही शिंदेंच्या शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं आहे. तर, सख्खी नणंदही महापालिकेची निवडणूक लढवणार आहे.
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) हिनं शिंदें सेनेचे माजी आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचा मुलगा समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) याच्याशी आपली लग्नगाठ बांधली. शिवसेनेतील फुटीमुळे यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशा लढती चर्चेत आहेत. अशातच प्रभादेवी-दादर भागातील वॉर्ड क्रमांक 194 मधील लढतीकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या प्रभागात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांचा मुलगा समाधान सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर याच प्रभागात सुनील शिंदे (Sunil Shinde) यांचे बंधू निशिकांत शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवार असणार आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासूनच हा विभाग चर्चेत होता. शिवसेनेतील अंतर्गत फुटीपासूनच इथे अनेकदा शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आपापसांत भिडलेले. लोकसभा आणि विधानसभेला या विभागातील नागरिकांनी ठाकरेंच्या उमेदवारांना निवडून दिलेलं. अशातच माजी नगरसेवक असलेले सदा सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांच्यासमोर ठाकरेंच्या उमेदवाराचा निभाव लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
समाधान सरवणकरांनी तेजस्विनी लोणारीसोबत बांधली लग्नगाठ
साधारणतः महिन्याभरापूर्वीच समाधान सरवणकरांनी मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारींसोबतच लग्नगाठ बांधलेली. त्यामुळे आता समाधान सरवणकरांच्या प्रचारासाठी मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी मैदानात उतरणार आहे. समाधान सरवणकरांनी मोठ्या जल्लोषात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला. त्यावेळी ‘चला विजयाचा फॉर्म भरायला’, असं म्हणत तेजस्विनीनंही आपल्या पतीच्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केलेला.
तेजस्विनीची सख्खी नणंदही निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांची लेक आणि समाधान सरवणकर यांची बहीण प्रिया सरवणकर गुरव सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तेजस्विनी लोणारी आपल्या पतीसोबतच नणंदेचाही प्रचार करणार आहे. प्रिया सरवणकर गुरव प्रभाग क्रमांक 191 मधून निवडणूक लढवली असून शिवसेना-भाजपा-रि.पा.ई. (अ) – रिपब्लिकन सेना महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यामुळं तेजस्विनी आता नणंदेसाठीही प्रचार करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.