मोठी बातमी: मतदानापूर्वीच भाजपचे दोन उमेदवार जिंकले, कमळ फुललं

डोंबिवली : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला. कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipal Election) निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं खातं उघडलं आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्याची आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे.(Kalyan Dombivli Municipal Election)

Kalyan Dombivli Municipal Election : प्रभागात केवळ भाजप उमेदवाराचाच आला अर्ज अन्…

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने दोन जागांवर मतदानापूर्वीच ‘कमळ’ फुलवलं. ‘प्रभाग १८ अ’मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांनीही विजय मिळवला आहे.

Kalyan Dombivli Municipal Election : आसावरी केदार नवरेंच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने बिनविरोध निवड

आसावरी केदार नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 (अ) मधून बिनविरोध विजय मिळवला आहे.

Kalyan Dombivli Municipal Election : मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकच अर्ज दाखल झाला

18 अ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी रेखा चौधरी यांचा एकच अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली आहे. त्यामुळं राज्यात भाजप महापालिका निवडणुकीत विजयाचे खाते उघडणार आहे. निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड होणार आहे.

Kalyan Dombivli Municipal Election : रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या

रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची अधिकृत प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 अ मधून त्यांची बिनविरोध निवड होणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल जाला आहे. कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्याने रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड होणार आहे.

Kalyan Dombivli Municipal Election : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. पुणेमुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.