ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजरांची खेळी; सीमा हिरेंच्या समर्थकांना डावलत आ

नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची खेळी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना एकाच घरात तीन उमेदवाऱ्या दिल्याने पक्षातील अंतर्गत वाद चर्चेत आला आहे. सुधाकर बडगुजर, मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भाजपने एबी (ab form) फॉर्म दिला आहे. हर्षा बडगुजर यांच्या जागेवर आमदार सीमा हिरे समर्थक भाग्यश्री ढोमसे यांनाही पक्षाने एबी फॉर्म दिला होता. मात्र हर्षा बडगुजर यांचा उमेदवारी अर्ज अगोदर आल्याने तो वैध ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Sudhakar Badgujar)

गेल्या आठ वर्षांपासून महापालिका निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांसह सर्वांचीच धाकधूक वाढली होती. भाजपने निवडून येण्याची क्षमता पाहून आणि निवडणूक सर्व्हेच्या नावाखाली आपल्याच पक्षाच्या अनेक माजी नगरसेवक आणि निष्ठावानांना डावलल्याचं दिसून आलं. निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ऐनवेळी आलेल्यांना देखील संधी दिली. पक्ष कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ पक्षांतील आयरामांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वाद उफाळल्याचं चित्र दिसून आलं.

BJP Nashik: भाजपत आले अन् तिकीट मिळवलं…

भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या अन्य पक्षांतील माजी नगरसेवकासह काही कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. १) खंडू बोडके २) नीलम नरेश पाटील ३) गुरूमितसिंग बग्गा ४) मनीष सुनील बागुल ५) प्रशांत दिवे ६) उषा बेडकोळी ७) दिनकर पाटील ८) अमोल दिनकर पाटील २) मानसी योगेश शेवरे १०) राजेंद्र महाले ११) सुधाकर बडगुजर १२) दीपक सुधाकर बडगुजर १३) कल्पना चुंभळे १४) कैलास चुंभळे १५) योगीता अपूर्व हिरे १६) अदिती ऋतुराज पांडे १७) हितेश यतीन वाघ १८) राहुल (बबलू) शेलार १९) शाहू खैरे २०) सचिन मराठे २१) डॉ. सीमा ताजणे २२) शाम गोहाड

BJP Nashik: काहींना एका तिकिटासाठीओढाताण, यांना मिळाली दोन तिकिटं

भाजपमध्ये तीस-चाळीस वर्षे काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागल्याचं दिसून आलं. तरीही त्यांना उमेदवारी मिळत नाही. मात्र, या निवडणुकीत तीन घरात दोन-दोन उमेदवारी देण्यात आली आहे. यात सुधाकर बडगुजर व त्यांचे पुत्र दीपक बडगुजर, कल्पना चुंभळे व त्यांचे दीर कैलास चुंभळे तसेच दिनकर पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल पाटील अशा एकाच कुटुंबातील दोनजणांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.