उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा डाव, सेनेतून एबी फॉर्म घेतला अन् ऐनवेळी भाजपमधून दाखल केला अर्

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या (Solapur Mahanagarpalika Election 2026) पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या आणि धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (Shiv Sena UBT) सोलापुरात मोठा धक्का बसला असून, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर (Ganesh Vankar) यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश केला आहे. वानकर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.

प्रभाग क्रमांक 6 मधून गणेश वानकर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनलने सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर एबी फॉर्म घेतले होते. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी स्वतः वानकर यांच्या निवासस्थानी जाऊन चारही उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. मात्र, अवघ्या एका दिवसातच नाट्यमय घडामोड घडली आणि वानकर यांनी मशालीचे फॉर्म बाजूला ठेवत थेट कमळ चिन्हावर भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. गणेश वानकर परिवार मागील तब्बल 40 वर्षांपासून ठाकरे कुटुंबाशी निष्ठावान मानला जात होता. त्यांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे समर्थक असल्याचे चित्र होते. त्यामुळे वानकर यांचा अचानक भाजप प्रवेश हा ठाकरे सेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Solapur Mahanagarpalika Election 2026: महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के

दरम्यान, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. काँग्रेसने जाहीर केलेले उमेदवार आणि माजी नगरसेवक फिरदौस पटेल यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत थेट एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक विनोद भोसले यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला सोलापुरात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरात 40 आमदार आणि 12 खासदार ठाकरे यांच्या विरोधात गेले होते. त्या काळात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोलापुरात पहिले कॅम्पेन गणेश वानकर यांनीच उभे केले होते. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या बॅनरमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तारखांसाठी वानकर यांना आजही न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

Solapur Mahanagarpalika Election 2026: “उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आजही मनात शल्य”

मात्र, आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडताना मनात वेदना असल्याची भावना गणेश वानकर यांनी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आजही मनात शल्य आहे. मात्र सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणूक मी भारतीय जनता पार्टीकडून लढवणार आहे,” अशी प्रतिक्रिया गणेश वानकर यांनी दिली आहे.

आणखी वाचा

Nagpur Election 2026: नागपूरमध्ये संघ मुख्यालयाच्या प्रभागातच तरुण स्वयंसेवकाने शड्डू ठोकला; भाजप नगरसेवकांवर निष्क्रियतेचा आरोप, म्हणाला….

आणखी वाचा

Comments are closed.