नगरपंचायत निवडणुकीत जादूटोण्यामुळं पराभव; गुन्हा दाखल करा, शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांचं धक्का

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात अनेक ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जादूटोण्यासारखे प्रकार समोर आले होते. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या वापरलेल्या वस्तू ठेवून त्यांच्या पराभवासाठी जादूटोणा केल्याचा आरोप केला जात होता, अशातच जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव झाला असा आरोप छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका पराभूत उमेदवाराने केला आहे. त्यामुळं जादूटोणा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार फुलंब्री पोलीस ठाण्यात त्यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची २० डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली. मात्र मतदानापूर्वीच दोन दिवस आधी फुलंब्री नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक ९ मधील भारत माता मतदान केंद्राच्या समोर कथित जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला होता. (Chhatrapati Sambhajinagar News)

निवडणुकीआधी झालेल्या या जादूटोण्याचा मतदान आणि मतमोजणीवर परिणाम झाला असून, जादूटोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार अमित वाहुळ यांनी केला आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर मतदान केंद्राच्या समोर जादूटोण्याशी संबंधित साहित्य आढळून आल्याची चर्चा परिसरात पसरली होती. या प्रकारामुळे अनेक मतदार भयभीत झाले असून, भीतीपोटी मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय बदलल्याचा दावा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित वाहुळ यांनी केला आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)

निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया असताना, अशा प्रकारे अंधश्रद्धेचा वापर करून मतदारांवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी अमित वाहुळ यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा अंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घटना घडणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिस प्रशासन नेमका काय निर्णय घेतो, गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

Chhatrapati Sambhajinagar: निवडणूक ड्यूटीला गैरहजर; 17 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी स्थिर सर्वेक्षण पथकात नियुक्त करण्यात आलेले एकूण 17 अधिकारी  आणि कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी स्वतःची माहिती देताना नोंदवलेले मोबाइल क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्या संबंधित कार्यालयांमार्फत संपर्क साधून त्यांना कर्तव्यास रुजू होण्याची ताकीद देण्यात आली होती. तरीदेखील ते निवडणुकीच्या कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानुसार सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.