सोलापुरात बंडखोरी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शहराध्यक्षाचा थेट इशारा; म्हणाल्या, अर्ज मागे..

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026: अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी तात्काळ अर्ज मागे घ्या, अन्यथा पक्षशिस्तीनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांni बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला आहे. ज्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही, त्यांनी पक्षहित लक्षात घेऊन माघार घ्यावी. सोबतच अर्ज माघारी घेऊन अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी व्हावे. माघार घेणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाकडून योग्य दखल घेतली जाईल. असे सांगत भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना माहितीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पक्षातील बंडखोर कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Solapur Election 2026: अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस, कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष

सोलापुरात भाजपमध्ये तिकीट वाटपवरून पक्षांतर्गत मोठा नाराजीनाट्य रंगलहे. जवळपास 20-25 कार्यकर्त्यांनी अपक्ष आणि इतर पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेत. परिणामीआज उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने या कार्यकर्त्यांना अर्ज माघारी घेण्याच्या माहिती भाजपकडून देण्यात आल्या आहे. दरम्यान असं नाही केल्यास पक्षशिस्तीनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा सोलापूर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांni बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे आजच्या अखेरच्या दिवशी भाजप कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना राष्ट्रवादी : 22 BACTगांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकमेकांपुढे उमेदवार

दुसरीकडेसोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेतील एकूण 102 जागापैकी 51-51 जागा दोन्ही पक्ष लढतील, असा फॉर्म्युला ठरला होता. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसनेने 62 तर राष्ट्रवादीने 54 ठिकाणी उमेदवार दिलेत. यामुळे जवळपास 22 जागावर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार युती असताना देखील एकमेकांच्या समोर उभे आहेत. आज महापालिका निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते या 22 जागाचा तिढा सोडवण्यासाठी एकत्रित बसणार आहेत. जर तोडगा निघाला नाही तर या जागावर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.

सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026 : सोलापूर पक्षनिहाय उमेदवार

(एकूण जागा – 102)

भाजप – 102

शिवसेना – 62

राष्ट्रवादी – 56

काँग्रेस – 48

राष्ट्रवादी (शपथ)- १२

शिवसेना उबाठा – 21

एमआयएम – 23

माकप – 7

मनसे – 3

वंचित – 21

आपण – 12

समाजवादी – 4

बसपा – 14

आरपीआय – 4

रासप – 3

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.