समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणा
Akola Crime News Akola: पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना (Akola Crime News) समोर आली आहे. समलिंगी नात्यातील संशय आणि वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत 30 वर्षीय किरन (नाव बदलले आहे) या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या नितेश अरुण जंजाळ (रा. संजय नगर, मोठी उमरी) याने हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी नितेशला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेमकं काय घडलं? (Akola Crime News)
अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर येथे आज सकाळी अचानक नितेश जंजाळ हा घराबाहेर येत जोरजोराने आरडाओरड करू लागला. “किरन (नाव बदलले आहे) खाली पडला असून तो मरण पावला आहे,” असे सांगत त्याने परिसरातील नागरिकांना घटनास्थळी जमा केले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घराची तपासणी केली असता किरनच्या (नाव बदलले आहे) अंगावर गंभीर जखमा आढळून आल्या. डोक्यावर आणि तोंडावर जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसून आल्याने पोलिसांना हत्या झाल्याचा संशय आला.
पोलिस तपासात उघडकीस आली हत्या-
पोलिसांनी नितेश जंजाळची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान, किरनसोबत (नाव बदलले आहे) राहत असलेल्याच नितेशने त्याची हत्या केल्याची बाब उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, लाठी-काठीने डोक्यावर आणि तोंडावर जोरदार वार करण्यात आल्याने किरनचा (नाव बदलले आहे) मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नात्यातील संशय ठरला कारण?- (Akola Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, किरन (नाव बदलले आहे) आणि नितेश जंजाळ हे दोघेही मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. सुरुवातीला चांगली मैत्री असलेल्या या दोघांचे नाते पुढे समलिंगी रिलेशनशिपमध्ये बदलले. मात्र, अलीकडील काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. अमोल इतर कोणाशी संबंध ठेवत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडणे होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून समोर आली आहे. काल रात्रीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री उशिरा नितेशने बाहेरून जेवण आणल्यानंतर हा वाद अधिक वाढला आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आरोपी ताब्यात; पुढील तपास सुरू- (Akola Crime News)
पोलिसांनी आरोपी नितेश जंजाळ याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.