जेलच्या शौचालयात शालच्या सहाय्याने गळा आवळून कैद्याने जीवन संपवलं; आई-मावशीच्या हत्येचा आरोपी
परभणी : नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेलं परभणी जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारागृहातील बंदिवान कैदी राजू अडकिने याने कारागृहातील शौचालयात शालीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत कैदी राजू अडकिने हा त्याच्याच कुटुंबातील आई, मावशी आणि मावशीचा नवरा या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी होता. बॅरेक क्रमांक एकमधील शौचालयात शालच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच न्यायाधीश, कारागृह अधीक्षक, पोलीस आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
परभणी जेलच्या बातम्या : मानसिक निरोगी वस्तुनिष्ठ बातम्या
आत्महत्या केलेल्या या कैद्याचे मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्याचं समोर आलं. या अगोदरही त्याने अशाच पद्धतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्याचा जीव वाचला होता. परंतु दुसऱ्या वेळी मात्र त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा आणि कैद्यांच्या मानसिक आरोग्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
तुरुंगातील हाणामारीत एकाचा मृत्यू
पुण्यातील येरवडा कारागृहातच हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात एका आरोपीला मारहाण झाली होती. बराक क्रमांक 1 मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये विशाल कांबळे अस मृत पावलेल्या आरोपीचे नाव आहे.
विशाल कांबळे याच्या डोक्यावर व कंबरेवर फरशीने वार करण्यात आले होते. आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशाल कांबळे याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.