नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नाशिक महानगरपालिका निवडणूक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांना हालचाली सुरु केल्या आहेत. राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करत आहे. आज उमेदवाराी अर्ज माघारी घेण्यासाठी शेवटचा दिवस होता. काही जणांना उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत, तर काही जणांनी बंडखोरी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमध्ये भाजपच्या उउमेदवारासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वसाधारण गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय पिंगळे यांनी भाजपचे उमेदवार मनीष सुनील बागुल यांच्यासाठी माघार घेतली आहे.
भाजपच्या उमेदवारासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण
उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचा आज माघारीचा शेवटचा दिवस होता. सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी आज दिवसभरात घडल्या प्रामुख्याने भाजपमध्ये अनेक बंडखोरांना थोपवण्याचे काम भाजपने आज केले अनेकांची मनधरणी करत अपक्ष उमेदवारी माघारी साठी बंडखोरांना थांबवण्यासाठी भाजपला यश आलं. मात्र प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वसाधारण गटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय पिंगळे यांनी भाजपचे उमेदवार मनीष सुनील बागुल यांच्यासाठी माघार घेतली. या माघारीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. ठाकरे गटाच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवारासाठी माघार का घेतली याचा खुलासा अद्याप ठाकरे सेनेने देखील केलेला नाही. मात्र ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार संजय पिंगळे यांनी माघार घेतल्यावेळी बागुल समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरेंच्या उमेदवाराने ही माघार मनीष बागुल यांच्यासाठी घेतल्याचे म्हटले मात्र दबावापोटी ही माघार घेतल्याची चर्चा प्रभाग सहा मध्ये जोरदार रंगत आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता
आज खरी महानगर पालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. कारण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर काही जणांनी बंडखोरी देखील केली आहे.सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकीटन मिळालेल्या काही नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान, काही ठिकाणी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे देखील नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
आणखी वाचा
Comments are closed.