अमित ठाकरेंचं एक विधान अन् संपूर्ण शिवसेना भवनात टाळ्या; आदित्य ठाकरेंसमोर काय घडलं?, VIDEO
अमित ठाकरे-आदित्य ठाकरे मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन उमेदवारांसमोर सादर केलं. शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 227 उमेदवारांसमोर मुंबईतील शिवसेना भवनात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाचं प्रेझेंटेशन मांडलं. यावेळी मुंबई भविष्याचं आणि मुंबईच्या भल्यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी कटीबध्द असल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. यादरम्यान, शिवसेना भवनात अमित ठाकरेंच्या एका विधानाने टाळ्यांचा कडकडाट झाला. (Shivsena UBT-MNS Alliance)
शब्द आहे ठाकरेंचा…!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) ह्यांच्या वतीने आज शिवसेना भवन येथे युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे ह्यांनी युतीच्या वतीने… pic.twitter.com/gwqGOrFG9j
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) 2 जानेवारी 2026
शिवसेना भवनात नेमकं काय घडलं? (Amit Thackeray-Aditya Thackeray)
मुंबईच्या विकासाचं वर्कशॉप प्रेझेंटेशन सादर करण्याआधी अमित ठाकरे यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन केलेच पण ज्यांना या युतीत तिकीट मिळालं नाही. त्या सर्व इच्छुकांचे मनापासून अभिनंदन केलं. या एकाही इच्छुकाने इतर पक्षांत तिकिटासाठी जे जे प्रकार केले तसं काहीही केलं नाही. उलट मराठी माणसाच्याप्रतीची बांधिलकी किती उच्च दर्जाची असू शकते हे सोदाहरण सिद्ध केलं. आपल्यातील कोणीही महापालिकेचं तिकीट मिळालं नाही म्हणून कुठेही मारामारी केलेली नाही. कोणतं कार्यालय फोडलं नाही, कोणीही एबी फॉर्म गिळला नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हीच निष्ठा असते. हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यामध्ये, असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंच्या या विधानानंतर शिवसेना भवनात एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. अमित ठाकरेंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आज मुंबईतील शिवसेना भवनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमित राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे नेते श्री. आदित्य उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या विकासाच वर्कशॉप प्रेझेंटेशन उमेदवारांसमोर सादर केला. त्यावेळी श्री. अमित ठाकरे यांनी उपस्थित उमेदवारांचे… pic.twitter.com/St9dsNv8vO
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 2 जानेवारी 2026
उद्धव ठाकरे काय म्हणाले? (Uddhav Thackeray-Raj Thackeray)
मुंबईतला मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, सामान्य मुंबईकर आणि मुंबईच्या विकासासाठी आपण मैदानात उतरलो असून आपला वचननामा सर्व मुंबईकरांपर्यंत पोहचवून तुमचा विजय पक्का कराल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी कोणत्या घोषणा केल्या? (Shivsena UBT-MNS Alliance BMC Election 2026)
- 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ
- मुंबईकरांसाठी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार
- पालिकेचे गृहनिर्माण प्राधिकरण करुन 5 वर्षांत 1 लाख परवडणारी घरे देणार
- घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये
- कोळी महिलांना माँ साहेब किचनमधून 10 रुपयात जेवण
- तरुणांना लाख रुपर्यंत रोजगार सहाय्यता निधी
- बेस्ट बसचे तिकीट कमी करून ५-१० १५-२० रुपये फ्लॅट रेट करणार
- प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर
- मुंबईत नवी पाच वैद्यकीय महाविद्यालये
- महापालिकेचे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारणार
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.