घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय! देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात अजितदादांच्या मोफत मेट्रो

पुणे :  राज्यात महानगरपालिकांचे वारे वाहू लागले आहे, दोन दिवसांवर निवडणूक आली आहे, अशातच अश्वासनांचा पूर वाहताना दिसत आहे, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर आपल्या पक्षांना सत्ता मिळावी यासाठी राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत. पुणे महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो मोफत करणार अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या जाहीरनामा सादर करताना केली. त्यामुळे, सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. अशातच अजित पवारांच्या या घोषणेवर काल (रविवारी, ता ११) पुण्यातील मुलाखतीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. किमान लोकांचा विश्वास बसेल अशा गोष्टी बोलाव्यात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) टोला लगावला  आहे.(Devendra Fadnavis)

Devendra Fadnavis and Ajit Pawar:  घोषणा करायला आपल्या बापाचं काय जाते: देवेंद्र फडणवीस

अजित पवार म्हणाले मेट्रोचे तिकीट मोफत केलं तर हे खरंच शक्य आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आज मी जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमान आहेत, त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे, अनाउन्स करायला काय जातंय, अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय, यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पुढे फडणवीस म्हणाले कसंय, अनेक वेळा आम्ही राजकीय क्षेत्रातील लोक आहोत, अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यामध्ये काहीही म्हणतो पण तरी माझं म्हणणं आहे की किमान पब्लिकचा विश्वास बसेल असा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ज्या आपण करू शकू, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या घोषणांची खिल्ली उडवली आहे

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार फक्त बोलतात. माझं काम बोलतं. मी आत्तापर्यंत संयम पाळला त्यांचा संयम ढासळला आहे. १५ तारखेनंतर अजित दादा नाही बोलणार देवेंद्र फडणवीस बोलणार आहे. कुठलाही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे. राज ठाकरे यांनी मला क्रेडिट दिलं त्यांचं मी आभार मानतो, त्यांचा मला आशीर्वाद मिळेल असंही फडणवीस म्हणालेत.

Devendra Fadnavis and Ajit Pawar: अजित पवारांच्या घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांनी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये, महापालिकेवर सत्ता आल्यास पुणेकरांना मेट्रो मोफत करणार अशी भलीमोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी केली. त्यामुळे, सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, मेट्रो (Metro) मोफत करण्याचा अधिकार महापालिकेला आहे का, यासह अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस सेवेचे आश्वासन देण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्ते यामुळे पुणेकरांचे पेट्रोलच्या स्वरूपात दररोज साडे सात कोटी रुपये वाया जातात. अशाप्रकारे वर्षाला दहा हजार आठशे कोटी रुपये पेट्रोलच्या स्वरूपात वाया जातात. त्यामुळे ते पैसे मेट्रोच्या प्रवासासाठी वापरता येतील, असा मोठा प्लॅन अजित पवारांनी सांगितला आहे. त्यामुळे, पुण्यात मोफत मेट्रो शक्य आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.