रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, अन् प्रियकरासोबत… नववीत शिकणाऱ्या मुलीचं भयं

UP Crime News: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 9वीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरून तिच्या आई वडीलांचं आयुष्य धोक्यात (UP Crime News) घातल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. संबंधित अल्पवयीन (UP Crime News) मुलगी ही रोज रात्री आपल्या आई-वडिलांच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळायची आणि ते गाढ झोपलेले असताना आपल्या प्रियकराला भेटायला जात होती. मात्र, वडिलांंनी एके दिवशी दाखवलेल्या चालाखीमुळे या ‘लव्ह स्टोरी’चा भयंकर शेवट झाल्याची माहिती समोर आली आहे.(UP Crime News)

UP Crime News: नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, या मुलीचे वडील मुंबईमध्ये पेंटिंगचं काम करतात. महिन्याभरापूर्वीच ते आपल्या गावी गेले होते, तेव्हा त्यांना मुलीच्या वागण्यामध्ये त्यांना मोठा बदल दिसून आला. ती तासनतास कोणाशीतरी फोनवरती बोलत बसयची. विशेष म्हणजे, रात्री जेवण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला विचित्र गुंगी यायची आणि गाढ झोप लागायची. वडिलांना संशय आल्याने त्यांनी पत्नीसोबत मिळून मुलीवर पाळत ठेवण्याचं ठरवलं. त्यानंतर घडत असलेलं धक्कादायक सत्य सर्वांसमोर आलं.(UP Crime News)

UP Crime News: झोपण्याचं नाटक केलं पण…

मुलीने ३ जानेवारीच्या रात्री नेहमीप्रमाणे सर्वांना जेवणातून गुंगीचं औषध दिलं. मात्र, आई-वडिलांनी ते खाल्लंच नाही तर ते बाजूला लपवून ठेवलं आणि झोपेचं सोंग घेतलं. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुलीने सर्वांना झोपलेलं पाहिलं, खात्री केली आणि ती हळूच शाल पांघरून घराबाहेर पडली. ती बाहेर पडताच वडिलांनी तिचा पाठलाग केला असता, ती २०० मीटर अंतरावर राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाच्या घरात शिरल्याचं दिसून आलं. संतापलेल्या वडिलांनी दोघांना रंगेहाथ पकडलं. या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे.

UP Crime News: प्रियकरच पुरवत होता गुंगीच औषधं

वडीलांनी आणि घरातील सदस्यांनी मुलीची कडक चौकशी केली तेव्हा तिने सर्व सत्य सांगितलं, ती म्हणाली की, गेल्या एक वर्षापासून ती या तरुणाच्या संपर्कात होती. तो तरुणच तिला तिच्या घरच्यांच्या जेवणात टाकण्यासाठी झोपेच्या गोळ्या आणून द्यायचा, ज्या ती गुपचूप जेवणात मिसळायची. घरचे बेशुद्ध झाल्यासारखे झोपले की ती प्रियकराकडे जायची आणि त्याच्यासोबत वेळ घालवायची.

या प्रकरणानंतर गावात पंचायत बोलवण्यात आली होती. मुलाने पुन्हा असं करणार नाही अशी कबुली दिली, पण तो सुधारला नाही. उलट, जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या घरातील व्यक्तींना त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर तिच्या वडिलांनी गुलरिहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी २२ वर्षीय आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.