पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला

अजित पवार पुण्यात: गेल्या 9 वर्षात पुण्याचा कारभार ज्यांच्याकडे होता, ती त्रिमूर्ती कारभार करण्यात कमी पडली आहे. केंद्र सरकारने पुण्यातील मेट्रोसाठी (मेट्रो टाका) आधीच निधी दिला होता. मात्र, पुण्यातील स्थानिक नेतृत्व पुणे मेट्रोच्या कामाला गती देण्यात कमी पडले, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (अजित पवार) यांनी केले. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी हडपसरमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुण्याची सत्ता आपल्या हातात देण्याचे आवाहन नागरिकांना केले. (पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६)

तुम्ही अनेकांना मतं देऊन बघितली. त्यांनी 9 वर्षांमध्ये काय केलं हे तुम्ही बघितलंय. शहराचा सर्वांगीण विकास करताना कारभारी आणि नेतृ्त्व कोण आहे, यावर ठरते. आता पुण्याचे नेतृत्व स्थानिकांमधील तीन लोक करतात. येथील पाण्याची टंचाई तुम्हाला माहिती आहे. आपण येथील रस्ते रुंद केले, पण त्याला क्रॉसिंग 9 वर्षांमध्ये झाले नाही. सबवे झाले नाहीत. अनेक ठिकाणी दुभाजकावर झाडं वाढली, अस्वस्छता आहे. कोणीही लक्ष देत नाही. पुण्यात नदी सुधार कार्यक्रम प्रारंभ आहे. मात्र, त्यापेक्षा पुण्याला जास्त गरज आहे ती, 24 पाणी देण्याची. यामध्ये पुण्यातील स्थानिक नेतृत्व कमी पडले. शहरात वाहतुकीची समस्या आ वासून उभी राहिली आहे. मतदान करताना नात्यागोत्याचा विचार करु नका. पुण्याची सूत्रे तुम्ही कोणाच्या हातात दिली आणि त्यांनी काय केलं, हे तुम्ही पाहिले आहे. काही अभिनेत्यांनी सांगितले च्या नाट्यगृहात किती घाण आहे. महानगरपालिकेने खर्च कुठे केला पाहिजे, याचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. (PMC Election 2026)

पुण्यात जातीजातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. यंदा आमच्या पक्षाने काही अनुभवी आणि काही नवीन चेहरे दिले आहेत. स्थानिक लोकांच्या हातात सत्ता आहे, त्यांचा भ्रष्टाचार रोखायचा आहे. आमच्या विरोधकांनी मटका चालवणाऱ्याच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. काहींचे तर गुंड निलेश घायवळ याच्यासोबत फोटो आहेत. या गुंडाला परदेशात पळून जायला कोणी मदत केली, हे तुम्हाला माहिती आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

मेट्रो ठेवा: पुण्यात मेट्रो प्रवास मोफत करण्यासाठी कॅबिनेटच्या परवानगीची काय गरज? अजितदादांचा प्रश्न

2017 नंतर पुण्याच्या विकासाला खीळ बसली. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली होती. पण स्थानिक नेतृत्त्वाला गतीने काम करता आले नाही. पुण्यातील मेट्रो प्रवास मोफत करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकी घेण्याची गरज काय आहे? मी अर्थमंत्री राहिलो आहे, मला माहिती नाही का? सध्या 75 वर्षांच्या पुढील प्रवाशांना पुण्यात मोफत बस प्रवास आहे. त्यासाठी कधी कॅबिनेटची परवानगी घेतली, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

आपल्या पीएमपीएलच वाहतूक फुकट करणार. मी रिक्षा चालकांना विनंती करेन, तुमच्या पोटावर पाय येऊन देणार नाही. विरोधक दोन्ही बाजूने बोलतात, हा फुकट करायला निघाला, याच्या काय घरंच आहे का? पण महानगरपालिकेच्या घरचं आहे, त्यांचा अधिकार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आम्ही लाडक्या बहि‍णींसाठी योजना आणली, त्या समाधानी झाल्या. ही योजना बंद केली नाही. तसेच आता पुणे महानगरपालिकेचे सध्याचे बजेट 12600 कोटी रुपये आणि पिंपर-चिंचवडचे बजेट 9600 कोटी आहे. दोन्हीकडे मेट्रो आणि पीएमपीएल मोफत करायचे झाले तर पुण्याला 300 कोटी आणि पिंपरी महानगरपालिकेला 200 कोटी दरवर्षी द्यावे लागतील. 500 कोटी गेल्याने फरक पडत नाही. त्यामुळे रस्त्यावरील 10 लाख वाहने कमी होतील, असा दावा अजित पवार यांनी केला.

आणखी वाचा

फडणवीसांनी मोफत मेट्रो प्रवासावरुन अजितदादांची खिल्ली उडवली, सुप्रिया सुळे मदतीला धावल्या, 15 लाखांचा मुद्दा बाहेर काढला

आणखी वाचा

Comments are closed.