खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा! पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही फडणवीसांचा अजितदादांवर हल्लाब

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुणे निवडणूक 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात शेवटची सभा घेतली. या शेवटच्या सभेतही देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. अजित पवार (अजित पवार) आणि शरद पवार (शरद पवार) यांची राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एकत्र निवडणूक लढत आहेत. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना मोफत पीएमपीएल बससेवा आणि मोफत मेट्रो (सबवे ठेवा) प्रवासाचे आश्वासन दिले आहे. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांनी आपल्या शेवटच्या सभेत अजित पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. मला कोणावर टीका करायची नाही. पण काहीजणांना आश्वासन देताना आपण कुठून पूर्ण करणार आहोत हे माहिती नाही. 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', अशी पुण्यात एक म्हण आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६)

माननीय मोदींजींच्या नेतृत्त्वात गेली काही वर्षे सातत्याने एक नवीन पुणे तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पुण्यात आधुनिकता यावी, पुण्याचे दळणवळण चांगले व्हावे, झोडपट्टीत राहणारे नागरिक आणि आर्थिक दुर्बलांना जास्तीत जास्त सोयी देण्यासाठी आम्ही सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. काही लोकांना असं वाटतं, महानगरापलिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळात दादा तयार करण्याची निवडणूक आहे. ही गल्लीबोळातील दादा तयार करण्याची निवडणूक नाही, ही शहराचं भावी नेतृत्व करण्याची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तुम्ही निवडून देणारे नगरसेवक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खंबीरपणे उभा आहे. जितका निधी लागेल तितका निधी मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला देईल. पुण्यातील 32 रस्त्यांवर वाहतूक डी कन्जेस्ट करणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जोपर्यंत तुमचा लाडका देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही जिंकल्यानंतर माझ्या बहिणींना लाडकी बहीण ठेऊ नका, लखपती बहीण करा. 50 लाख महिला लखपती बहीण झाल्या आहेत. मोदींनी लाडक्या लखपती बहीण योजना आणली आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यात ही योजना राबवली जाईल. पुण्यात आपला महापौर बसणार आहे. पुढच्या वेळेस मी विचारणार आहे की, किती महिलांना लखपती बहीण बनवलं आणि तरच त्यांना पुढच्या वेळेस तिकीट देणार. 15 तारखेला सकाळी उठायचंघड्याळाचा गजर लावायचा ते घड्याळ बंद करायचं. मतदान केंद्रावर जायचं कमळ पाहायचं उमेदवाराचा चेहरा पाहायचा, एक गोष्ट लक्ष ठेवायची फक्त कमळाचे बटण दाबायचं. 15 तारखेला कमळाची काळजी घेतली तर पुढची पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकील नाही, पण…; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?

आणखी वाचा

Comments are closed.