मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी शेवटचा डाव टाकला, ‘ती’ पोस्ट व्हायरल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बीएमसी निवडणूक 2026: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गुरुवारी सकाळी 7.30 वाजता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Election 2026) मतदानाला सुरुवात होईल. त्यानंतर 16 जानेवारीला लगेच मतमोजणी होऊन या निवडणुकीला निकाल जाहीर केला जाईल. मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुंबईकरांना ठाकरे बंधूंच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले आहे. (Mumbai Mahanagarpalika Election 2026)
संजय राऊतांच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘सर्व मराठी माणसांचं ठरलंय… एक आहे तर सेफ आहे! आणि ठाकरेच बेस्ट आहे’, असे या मजकुरात लिहले आहे. दरम्यान, आज सकाळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. यावेळी शिवतीर्थावर संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. याठिकाणी राज आणि उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनाला गेले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या 227 प्रभागांसाठी 15 जानेवारीला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदानप्रक्रिया संपन्न होईल. त्यानंतर 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
विजय महाराष्ट्र pic.twitter.com/JuzkMIMXHk
— संजय राऊत (@rautsanjay61) 14 जानेवारी 2026
Mumbai Mahanagarpalika Election 2026: हिंदूंच ठरलंय, आय लव्ह महादेवच… नितेश राणेंची पोस्ट
एकीकडे संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना मतदान करण्याचे आवाहन केले असताना भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत मुंबईकरांना साद घातली आहे. हिंदूंच ठरलंय, आय लव्ह महादेवच…, असा मजूकर असलेली पोस्ट नितेश राणे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या माध्यमातून नितेश राणे यांनी मुंबईकरांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता मुंबईकर कोणाच्या पारड्यात आपले दान टाकणार, हे उद्या स्पष्ट होईल.
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निकालाला उशीर लागणार?
यंदाच्या महापालिका निवडणुकीत 2017 प्रमाणे सर्व २२७ प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी होणार नाही. यावेळी मतमोजणी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, शुक्रवारी सकाळपासून ही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे. मुंबई शहरात एकूण 23 मतमोजणी अधिकारी असून, प्रत्येक अधिकारी साधारण दहा प्रभागांची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र, एकावेळी केवळ दोन प्रभागांची मतमोजणी केली जाईल. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त 46 प्रभागांचेच मतमोजणीचे काम होणार आहे.
आणखी वाचा
निवडणूक आयोगाने ‘पाडू’ मशीन आणलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल, मतदानाच्या एक दिवसाआधी काय घडलं?
सर्वाधिक हायव्होल्टेज असलेल्या मुंबई मनपाचा निकाल लांबणार! नेमकं कारण आलं समोर
आणखी वाचा
Comments are closed.