मला राजकारण कळत नाही, वरचे निर्णय घेतात; भाजपचे आमदार सुभाष देशमुख अद्याप पक्ष अन् पक्षश्रेष्ठी
सोलापूर: आज २९ महानगरपालिकासाठीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे, अशातच भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी कुटुंबीयांसमवेत येऊन बजावला (Solapur Municipal Corporation Election 2026) मतदानाचा हक्क बजावला, मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना काही महत्त्वांच्या गोष्टींवर भाष्य केलं त्यातून (Solapur Municipal Corporation Election 2026)आमदार सुभाष देशमुख यांची पक्ष आणि पालकमंत्र्यांबाबतची नाराजी अजूनही कायम असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मी साधा माणूस मला राजकारणातलं काही कळत नाही मी फक्त काम करीत असतो. सर्व निर्णय घेणारे वरिष्ठ आहेत त्यामुळे मला यातले काही कळत नाही अशी कडवट प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.(Solapur Municipal Corporation Election 2026)
आज आमदार सुभाष देशमुख यांनी कुटुंबासोबत येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. गेल्यावेळी सोलापूर महापालिकेवर आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय देशमुख यांनी 49 जागा जिंकत सत्ता आणली होती. यावेळी मात्र संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत हे दोन्हीही आमदार प्रचारात फारसे दिसले नव्हते. याबाबत त्यांना विचारले असता मी प्रचार केला पण माध्यमांसमोर आला नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. आम्ही दोन आमदारांनी गेल्या वेळेला 49 जागा जिंकून महापालिका आणली होती आता तर पक्षाचे तीन आमदार आहेत त्यामुळे यापेक्षा जास्त जागा जिंकून यायला पाहिजेत असेही खोचक उत्तर त्यांनी दिले.
महापालिकेला महायुती झाली असती तर याचा मोठा फायदा झाला असता का? याबाबत विचारले असता हे सर्व निर्णय वरचे घेतात मला त्यातले काही कळत नाही. मैत्रीपूर्ण लढायचे म्हणतात आणि टीका करायची नाही म्हणतात, मी आपला सामान्य माणूस असल्याने हे राजकारण मला काही कळत नाही असे सांगत त्यांनी भाजप वरिष्ठांवरही कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली. आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार दिलीप माने यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजप पक्षात आणल्याने आमदार देशमुखांची नाराजी होती. यातच तिकीट वाट पाहतही आमदार देशमुखांच्या अनेक सहकाऱ्यांची तिकिटे कापली गेल्याने ते संपूर्ण प्रचारापासून अलिप्त होते. आज मतदानाला आल्यावरही ज्यांनी निवडणूक लढवली त्या प्रत्येकाला आपण विजयी होऊ असे वाटत असते मात्र केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने महापालिकेतही भाजपची सत्ता येण्यास काहीच हरकत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मला वरचं काही कळत नाही. युती आघाडी बाबत वरची लोके निर्णय घेतात. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने महापालिकेत देखील भाजप सत्ता येईल. आम्ही दोन आमदार असताना गेल्यावेळी महापालिकेत भाजपच्या 49 जागा निवडून आणल्या होत्या. आता तर तीन आमदार आहेत त्यामुळे किती जागा येतील सांगता येत नाही. सोलापुरात महायुती झाली असती तर यावर बोलताना मी खूप सामान्य माणूस आहे. हे निर्णय वर घेतात. माझ्यासारख्याला त्याबाबतचे काही कळत नाही. एका बाजूला मित्र पक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढा म्हणतात आणि टीका करू नका म्हणतात, यातील काहीच माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळत नाही . तुम्हाला वाटते मी महापालिकेत प्रचार केला नाही पण मी फक्त माध्यमांसमोर आलो नाही प्रचार करतच होतो असंही त्यांनी पुढे मिश्कीलपणे म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.