ईव्हीएमवर धनुष्यबाणाचं बटण दाबताच लागला भाजपचा लाईट; नाशिकमधील शिंदेंच्या उमेदवारांचा खळबळजनक द
नाशिक निवडणूक 2026 मतदान: नाशिक महापालिकेच्या (NMC Election Voting) 122 जागांसाठी आज (दि. १५) मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील एका मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा दावा आहे की, मतदारांनी धनुष्यबाण चिन्ह दाबल्यानंतर ईव्हीएम मशीनवर भाजपचा लाईट लागत आहे. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण पसरले आहे.
Nashik Election 2026 Voting: मतदारांची लेखी तक्रार
या प्रकाराबाबत काही मतदारांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. मतदान करताना ईव्हीएममध्ये तांत्रिक गडबड असल्याचा संशय मतदारांनी व्यक्त केला असून, तातडीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
Nashik Election 2026 Voting: धमकावल्याचा आरोप
दरम्यान, या प्रकरणात आणखी गंभीर बाब समोर आली असून, तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकावले जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ वाढला असून, काही काळ मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये चर्चांना उधाण आले आहे. प्रभाग क्रमांक 24 मधील या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी उर्वरित मतदान केंद्रांवर मतदान शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोग काय भूमिका घेते? तसेच चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nashik Election 2026 Voting: नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 6.51 टक्के मतदान
दरम्यान, नाशिक महापालिकेसाठी आज 13 लाख 60 हजार 722 मतदार मतदानाचा हक्क बजावत असून, यामध्ये 6 लाख 56 हजार 675 महिला आणि 7 लाख 3 हजार 968 पुरुष मतदार आहेत. शहरात एकूण 1,563 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सकाळी साडेसात वाजेवासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी साडेनऊ पर्यंत नाशिकमध्ये 6.51 टक्के इतके मतदान झाले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.