राजकीय वैमन्यासातून सोलापुरात मतदानच्या शेवटी दोन गटात तुफान हाणामारी, दोन जण जखमी
सोलापूर महानगरपालिका निवडणूक आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे तर काही ठिकाणी पैसे वाटप करुन गेल्यासह मतदान करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सोलापुरात मतदानच्या शेवटच्या वेळी दोन गटात जोरदार भांडण झाल्याची घटना घडली आहे. सोलापुरातल्या किडवाई चौक परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.
राजकीय पूर्ववैमन्यासातून खलिफा आणि मैंदर्गीकर या दोन गटात वाद झाल्याची
राजकीय पूर्ववैमन्यासातून खलिफा आणि मैंदर्गीकर या दोन गटात वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही गटातील एक एक व्यक्ती जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या भांडणानंतर पोलीस उपायुक्तसह पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. साडे पाट वाजण्याच्या आधी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांची मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. दरम्यान, सोलापुरात मतदान संपल्यानंतर शहरात काही ठिकाणी किरकोळ वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यानंतर खुद्द पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं.
. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी 1091 मतदान केंद्रांवर मतदान झाले
मतदानाला केवळ एक तास उरला असतानाही सोलापूर शहरातील अनेक केंद्र पडली ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे यावरून दिसत आहे. दुपारी साडेचार पर्यंत 42 ते 45 टक्के एवढेच मतदान झाले होते. काही कामगार वस्त्या वगळता 80 टक्के बूथ रिकामे दिसत आहेत. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी 1091 मतदान केंद्रांवर मतदान झाले.
सोलापुरात प्रभाग 15 मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून निकाला आधीच जल्लोष
दरम्यान, यावेळी सोलापूर महानगरपालिकेतील मतदानाचा टक्का घसरला आहे. अंदाजे सोलापूर महानगरपालिकेसाठी 52 ते 55 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. सोलापुरात प्रभाग 15 मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून निकाला आधीच जल्लोष करण्यात आला आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला आहे. दोन्ही बाजुचे कार्यकर्ते एकमेकांस्मार आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे प्रभाग 15 ड तर भाजपचे विनोद भोसले 15 क मधून उमेदवार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण…
आणखी वाचा
Comments are closed.