पुण्यातील दारुण पराभवानंतर अजितदादा सकाळीच शरद पवारांना भेटले, दीड तास खलबतं, पुढचा प्लॅन ठरला?
पुणे: पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन पक्ष एकत्र आले. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच प्रचाराचा दिसत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या पालिकेतील कारभारावर प्रचारा टीका केली होती. अजित पवार यांनी जाहीरनाम्यात मोफत मेट्रो, पीएमपी बस देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “घोषणा करायला तुमच्या बापाचं काय जातं,” आणि मोफत योजनेवरून खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर भाजपने पालिकेच्या तिजोरीत आणा ठेवला नाही. मी बाजीराव आहेच, असे प्रतिउत्तर दिले होते, पण राष्ट्रवादी कॉंग्रेसला अवघ्या ३० जागा मिळाल्या, त्यामुळे घडळ्याचे काटे उलटे फिरले. हा निकाल अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला बसलेला मोठा धक्का आहे. तर आता पुन्हा नव्या दमानं उतरण्यासाठी आज या पक्षातील मुख्य नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती आहे.
अजितदादा सकाळीच शरद पवारांना भेटले, दीड तास खलबतं
बारामती कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांसह अजित पवार आणि दोन्ही पक्षातील मोठ्या नेत्यांची भेट झाली, या भेटीवेळी नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद बागेत नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते, या भेटीवेळी झेडपी निवडणुकीसदंर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
अजित पवार आणि शरद पवारांची गोविंद बागेत दीड तास चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादींना महानगरपालिका निवडणुकीमध्ये म्हणावं तस यश मिळालं नाही. पंचायत समितीमध्ये स्थानिक नेत्यांना विचारुन एकत्र लढायचं की नाही ठरवणार असल्याचं समोर आलं आहे. अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील हे सर्वजण कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले आहेत. स्थानिक पातळीवरचा आमचा निकाल मान्य आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत काही दिवसात ठरेल, विलीनकरणाबाबत चर्चा नाही अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
तर भेटीबाबत बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, समविचारी मतदारांची विभागणी टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढवणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? या प्रश्नावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, सध्या तरी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत असे उत्तर दिले.
बैठरीवेळी कोण कोण होतं उपस्थित?
शरद पवार
अजित पवार
सुप्रिया सुळे
रोहित पवार
राजेश टोपे
अमोल कोल्हे
आणखी वाचा
Comments are closed.