सूर्यकुमार यादवचं प्रकरण न्यायालयात; अभिनेत्रीवर 100 कोटींचा मानहानी दावा, नेमकं काय घडलं?

Suryakumar Yadav and Khushi Mukherjee Controversy : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव आणि अभिनेत्री खुशी मुखर्जी यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. ‘सेलेब्रिटी इमेज’ विरुद्ध ‘पब्लिसिटी स्टंट’ अशी ही लढाई थेट कायदेशीर वळणावर पोहोचली असून, सूर्यकुमार यादवची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून खुशी मुखर्जीवर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल झाल्याची चर्चा आहे.

मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अंसारी यांचा दावा आहे की, प्रसिद्धी मिळवण्यासाठी खुशी मुखर्जीने भारताच्या टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादववर बिनबुडाचे आरोप केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फैजान यांनी 100 कोटींची नुकसानभरपाई, तत्काळ एफआयआर आणि किमान 7 वर्षांची शिक्षा अशी मागणी केली आहे. सध्या फैजान गाझीपूर (उत्तर प्रदेश) येथे ठाण मांडून असून, ही लढाई त्यांनी क्रिकेटरच्या सन्मानासाठीची असल्याचे म्हटले आहे.

खुशी मुखर्जीने नेमके काय म्हटले होते?

एका कार्यक्रमादरम्यान पापाराझींशी बोलताना खुशी मुखर्जीने आपण कोणत्याही क्रिकेटरला डेट करत नसल्याचे सांगितले होते. तसेच सूर्यकुमार यादव आपल्याला सतत मेसेज करत असतो, मात्र आता त्यांच्यात कोणताही संवाद नाही आणि आपले नाव त्यांच्याशी जोडले जाऊ नये, असेही ती म्हणाली होती.

वाद चिघळल्यानंतर खुशी मुखर्जी बॅकफुटवर गेली आहे. प्रकरण कायदेशीर स्वरूप घेताच तिने डॅमेज कंट्रोल सुरू केले. तिच्या म्हणण्यानुसार, तिचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. तिने आपले इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचा दावाही केला आहे. तसेच सूर्यकुमार यादवशी झालेली चर्चा ही केवळ मैत्रीपूर्ण होती आणि एका सामना पराभूत झाल्यानंतर सहानुभूतीपोटी संवाद झाला होता, असे तिने स्पष्ट केले आहे.

पुढे काय घडू शकते?

या संपूर्ण प्रकरणावर सूर्यकुमार यादव याने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. तो सध्या आपल्या खेळावर आणि आगामी स्पर्धांवर लक्ष केंद्रित करत आहेत. दरम्यान, 100 कोटींचा मानहानीचा दावा सिद्ध करणे फैजान अंसारींसाठी मोठे आव्हान असले, तरी या प्रकरणामुळे खुशी मुखर्जीसमोर गंभीर कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गाझीपूर पोलीस आता दाखल झालेल्या लेखी तक्रारीची चौकशी करत आहेत. जर एफआयआर नोंदवण्यात आली, तर खुशी मुखर्जीला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. मोठ्या व्यक्तिमत्त्वांवर बेधडक आरोप करणे कोणालाही अडचणीत आणू शकते.

हे ही वाचा –

Virat Kohli News : मैदानात उतरायच्या आधी विराटची देवाकडे धाव, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या निर्णायक लढतीआधी कोहली महाकालाच्या चरणी

आणखी वाचा

Comments are closed.