ठाकरें बंधूंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, अंबादास दानवेंची पोस्ट

अंबादास दानवे : छत्रपती संभाजीशहर : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या बाहेर काढलेअंती बहुतांश ठिकाणी भाजपचंf आणि कमळ फुलल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. तब्बल 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, हे आता जवळ जवळ स्पष्ट झालं आहे.

दुसरीकडेबालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेनेला त्यांचा गड देखील राखता आला नाहीया. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत (Chhatrapati Sambhajinagar Muncipal Corporation Election Result) ठाकरे गटाने 94 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला दोन आकडी विजयही मिळवता आलेला नाही. ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. यात्यामुळे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनाही भावाच्या पराभवामुळे फटका बसल्याचा दिसून आलंहे. या सर्व पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट करत भाष्य केलंहे. अंबादास दानवे यांनी नियम ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केलाय. यावर आपलेच फितूर निघाले तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढू असं लिहलं आहे. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची हि पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Ambadas Danve on BJP : पैशाची वृष्टी भाजपच्या आकाशातून झाली. धो-धो पैशाचा पाऊस झाला

एकीकडे बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा गड राखता आला नाही. दुसरीकडे शिंदे गटाला ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जागाच मिळाल्या असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचा चित्र आहे. यावर बोलतानाही अंबादास दानवे म्हणाले तेपराभव मान्य केला पाहिजे. 35 ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आहे. आमचे 7 ठिकाणी विजय झाले. आम्ही प्रचार चांगला केला होता, मात्र पैशाची वृष्टी भाजपच्या आकाशातून झाली. धो-धो पैशाचा पाऊस झाला. 14 तारखेला 25 टक्के मतदान झाल्याची घटना घडली, अशी तक्रार आहे. मतदान रीसेट झाले अशीहे तक्रार झाली आहे. या शहराला भाजपने पाणी दिले नाही, तरी जनतेने भाजपला निवडून दिले आहे. जनतेच्या मनात काही असेल तर शुभेच्छा, असेही अंबादास दानवे म्हणाले.

Ambadas Danve : हरलो हे आमचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दुर्दैव

फक्त, सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही, हे सत्य आहे. हरलो हे आमचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दुर्दैव आहे. यांच्याकडे सर्व उपलब्ध असताना ते 11,12 पर्यंत पोहोचविले. आम्हला संपविले मात्र त्यांचे जे कलीग आहे. त्यांना तरी संपवायला नको होतं. येणाऱ्या काळात निवडून आलेले 70 लोक मुंबईला दिशा देतील. आमचे सगळे गेले तरी आम्ही 70 जगा जिंकल्या. हे काही कमी नाही. असेही ते म्हणाले.

आणखी वाचा

Comments are closed.