सफाई कामगाराचा मुलगा ते पुणे महापालिकेचा नगरसेवक; पठ्ठ्याने करुन दाखवलं, विजयाचा गुलाल उधळताच

पुणे: पुण्यात महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत स्पष्ट बहुमताच्या दिशेने मजल मारली असताना, या निकालातून एक विशेष प्रेरणादायी कथा समोर आली आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत अमर आवळे यांनी क्रमांक २७ मधून विजय मिळवत राजकारणात स्वतःची ठळक ओळख निर्माण केली आहे. अमर आवळे यांचे आई आणि वडील गेली तब्बल 25 वर्षं पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून सेवा देणाऱ्या वडिलांचा मुलगा थेट नगरसेवक बनल्याने हा विजय केवळ राजकीय न राहता सामाजिक संदेश देणारा ठरला आहे.

अमर आवळेच्या विजयाने पुणे महानगरपालिका निवडणुकीत एक प्रेरणादायी इतिहास घडला आहे.सफाई कामगाराचा मुलगा थेट नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. अमर आवळे यांचे आई आणि वडील तब्बल 25 वर्षं पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. दररोज पहाटे उठून पुणे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली.आज मात्र त्याच कष्टांचं फळ मिळाल्याचं समाधान त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंमधून स्पष्टपणे दिसत आहे. मुलगा नगरसेवक झाल्याचा अभिमान, आनंद आणि भावुकता हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.

अमरने केलेल्या संघर्षाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला असून, मोठ्या मताधिक्याने त्याला विजयी केलं आहे.आज अमर आवळे यांच्या घरी शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होताना पाहायला मिळतोय. नातेवाईक, मित्र आणि स्थानिक नागरिक विजयाच्या आनंदात सहभागी होत आहेत. अमर आवळे यांचे साने गुरुजी नगर हे कार्यक्षेत्र आहे. मात्र एकीकडे नगरसेवक म्हणून अमर आवळे महापालिकेच्या सभागृहात पोहोचले असले, तरी दुसरीकडे आजही त्यांचे आई-वडील सफाई कामगार म्हणून पुणे महानगरपालिकेच्या यंत्रणेत प्रवेश आपली सेवा बजावत आहेत.

भाजपकडून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

भाजपने पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत मोठे यश संपादन केले आहे. या यशात अनेक प्रस्थापित नेत्यांसह नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा

Comments are closed.