अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; जुहू परिसरात मर्सिडीजची धडक, रिक्षा चेपली, मध्यरात्री

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी असलेल्या वाहनाचा मुंबईत अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जुहू येथील थिंक जिमजवळ हा अपघात झाला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.(Akshay Kumar Car Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार शूटिंग आटोपून पत्नी ट्विंकल खन्नासोबत परतत असताना त्यांच्या मर्सिडीज कारच्या पुढे सुरक्षा वाहन होते. याच दरम्यान एका अन्य मर्सिडीज कारने सुरक्षा वाहनाला धडक दिली. धडकेनंतर हे वाहन रस्त्यावरून जाऊन एका ऑटो रिक्षाला धडकले आणि उलटले. या अपघातात ऑटो चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Akshay Kumar Car Accident) अपघातानंतर अक्षय कुमार यांनी स्वतः पुढाकार घेत जखमी ऑटो चालकाला रुग्णालयात नेण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे. सुरक्षा वाहन उलटल्यामुळे त्यातील काही सुरक्षारक्षक आत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदत केली. यासंदर्भातील व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला आहे.(Akshay Kumar Car Accident)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज कारच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.(Akshay Kumar Car Accident)अपघाताचा व्हिडीओही समोर आला असून त्यात अक्षय कुमार यांची सुरक्षा वाहन ऑटो रिक्षावर उलटलेली स्पष्टपणे दिसत आहे. अपघात होताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटनेची तीव्रता त्यातून दिसून येते.

पोलिसांचा तपास सुरू

दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार किंवा एफआयआर दाखल झालेली नाही. अपघात मर्सिडीज कारच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे, याबाबतही अद्याप स्पष्टता आलेली नाही.

या संपूर्ण घटनेवर अक्षय कुमार यांच्या टीमकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताची नेमकी कारणे समोर येण्याची शक्यता आहे. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणली. दरम्यान, चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना या अपघातात पूर्णपणे सुरक्षित आहेत. या धक्कादायक घटनेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेता आणि त्यांच्या टीमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.