पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी; दुधवाल्यानेच मारला डल्ला, डिजीटल लॉ

गुन्हे बातम्या ठेवा: पुण्यातील विमाननगर (Viman nagar) परिसरात प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या (Rameshwaram Cafe) मालकाच्या घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणात घरात नियमितपणे दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दुधवाल्यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. व्यंकटेश करंडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी विमाननगर पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घराला डिजिटल लॉक बसवण्यात आले आहे. आरोपी व्यंकटेश करंडे हा गेल्या अनेक दिवसांपासून या घरावर पाळत ठेवून होता. घरात दूध टाकण्यासाठी येताना तो वारंवार डिजिटल लॉकचा पासवर्ड टाकून पाहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र प्रत्येकवेळी त्याचा प्रयत्न फसत होता.

Pune Crime News: डिजीटल लॉकचा पासवर्ड सापडला अन्…

अखेर 17 सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपीला डिजिटल लॉकचा अचूक पासवर्ड समजला. त्यानंतर त्याने घरात प्रवेश करून कपाटातील 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड लंपास केली. चोरीनंतर तो तेथून पसार झाला. दरम्यान, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून, त्याच आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

Pune Crime News: सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पटली आरोपीची ओळख

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून विमाननगर पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घरात विश्वासाने येणाऱ्या व्यक्तीकडूनच चोरी झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी विमाननगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयातून आरोपीचे पलायन

दरम्यान, पुण्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ससून रुग्णालयातून सनी गौतम कुचेकर या आरोपीने सोमवारी (दि. 19) पलायन केल्याची घटना घडली आहे. फिटसारखे झटके येत असल्याने त्याला रविवारी वॉर्ड क्रमांक 16 मध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृती सुधारताच त्याने पोलिसांची नजर चुकवून पलायन केल्याचे समोर आले आहे. आरोपीने स्वच्छतागृहाच्या काचा काढून, इमारतीच्या रंगकामासाठी उभारलेल्या बारच्या साहाय्याने पळ काढल्याची माहिती ससून प्रशासनाने दिली. बेड्यांमधून सुटका करून घेतल्याचा संशय असून, पलायनाचा क्षण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

आणखी वाचा

Pooja Khedkar Father Dilip Khedkar: ड्रग्ज देऊन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांची दुटप्पी भूमिका, पूजा खेडकरच्या वडिलांचे गंभीर आरोप; घरातील चोरीबाबत सगळंच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.