ड्रग्ज देऊन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांची दुटप्पी भूमिका, पूजा खेडकरच्या वडिलांचे गंभीर
पूजा खेडकर वडील दिलीप खेडकर बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) पुण्यातील औंध परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील बंगल्यात रविवारी 11 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात बंगल्यात काम करणाऱ्या एका नोकराने मध्यरात्री पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले, असा आरोप करण्यात येत आहे. तसेच, त्यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेवर आता पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी धक्कादायक आरोप केले असून, या चोरीमागे नेमके कोण आहे आणि घटना कशी घडली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
दिलीप खेडकर म्हणाले की, आमच्या घरी केवळ चोरी झाली म्हणून पत्रकार परिषद घेत आहे. पोलिसानी दुर्लक्ष केले, आम्ही बनाव केला, असा गैरसमज पसरवला गेला. ड्रग्ज वापरून आमचा खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. ते ड्रग्स पुण्यात कुठेच उपलब्ध नाहीत. आम्हाला पाच दिवस हॉस्पिटलमध्ये ट्रिटमेंट घ्यावी लागली. शेतात झालेल्या भांडणाची दखल घेतली जाते. पण, या जबरी चोरीची पोलिसांनी दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.
Pooja Khedkar Father Dilip Khedkar : पोलिसांची भूमिका दुटप्पी
दिलीप खेडकर पुढे म्हणाले की, या प्रकरणात अजूनपर्यंत कोणताच तपास नाही. नको तेव्हा पुणे पोलीस गेटवरून आमच्या घरी येतात. पोलीस आयुक्त आमचे शस्त्रपरवाने रद्द करतात. पोलिसांची भूमिका दुटप्पी आहे. आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. लवकर उपचार मिळाले म्हणून आम्ही वाचलो आहोत. पोलिसांकडून हलगर्जीपणा केला जातोय. त्यांनी जर ठरवलं तर लगेच चोरांना पकडलं जाईल. पोलिसांचं रेट कार्ड देखील ठरलेलं असतं. शासन आणि प्रशासन काम करत नाही.
Pooja Khedkar Father Dilip Khedkar: प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे
आमच्या शेजारी राजभवन आहे. पोलीस अधीक्षकांचा बंगला आहे. आम्ही नोकर देखील चांगल्या कंपनीकडून घेतला होता. तरी पण त्यांनी बनाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आमच्या कुटुंबाला प्रत्येक वेळी टार्गेट केलं जात आहे. साधा अपघात झाला असताना 15 दिवस पोलीस आमच्या घराबाहेर होते. गरज नसताना खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो. पण, या प्रकरणात मात्र पोलीस भूमिका घेत नाहीत. बाहेरच्या देशातील लोक बाहेरून येवून अस करत असतील तर यंत्रणा काय काम करत आहे? या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दिलीप खेडकर यांनी केली.
Pooja Khedkar Father Dilip Khedkar: ठराविक गोष्टीचीच चोरी केली
हिकमत शाहिद असं या आरोपीचे नाव असून तो नेपाळचा आहे. आमच्या घरात 7 लोक आले होते, बाहेर पण 7-8 लोक होते. सगळे मिळून 15 सराईत गुन्हेगार होते. चोरी करण्यासारखं घरात खूप काही होतं पण ठराविक गोष्टी घेवून गेले. 3-4 लाख रुपये कॅश आणि काही सोनं चोरीला गेलं आहे. आम्हाला प्लॅन करून मारण्यासाठी ते आले होते. एका महिन्यात आम्हाला त्या व्यक्तीवर संशय आला नाही. या घटनेमुळे मनोरमा खेडकर यांना खूप त्रास झालाय. आम्ही त्यांना अजून सगळं सांगितलं नाही. त्यांना चक्कर आली, असं सांगितलं आहे, असे देखील दिलीप खेडकर यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.