ईशान किशन IN, तिलक वर्मा OUT; आज न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-20 सामना, अशी असेल टीम इंडियाची Play

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन 1ली T20 विरुद्ध न्यूझीलंड: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (Ind vs NZ ODI Series) खेळवण्यात आली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 2-1 ने पराभव केला. 38 वर्षांच्या इतिहासात न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात येऊन टीम इंडियाचा एकदिवसीय सामन्यात पराभव केला. एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि न्यूझीलंडचा पहिला सामना नागपूरमध्ये रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून पहिल्या टी-20 सामन्याला सुरुवात होईल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील ही मालिका टी-20 विश्वचषकाची तयारी म्हणून पाहिली जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वीच कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे की, तिलक वर्माच्या अनुपस्थितीत ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकणार नाही. त्यामुळे भारतीय संघाची संभाव्य Playing XI समोर आली आहे.

पहिल्या टी-20 साठी टीम इंडियाची कशी असेल प्लेईंग इलेव्हन? (Ind vs NZ 1st T20)

अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन सलामीवीर म्हणून मैदानात उतरतील. ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल. इशान किशनचे तिसऱ्या क्रमांकावर खेळणे निश्चित झाले आहे. इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ईशान किशनची टी-20 विश्वचषक संघातही निवड झाली आहे. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह फलंदाजीसाठी येतील. हार्दिक पांड्या दुखापतीतून परतत आहे, तर शिवम दुबे संघात त्याचे स्थान कायम ठेवण्याची अपेक्षा आहे. या दोन अष्टपैलू खेळाडूंच्या उपस्थितीमुळे टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन अधिक मजबूत झाली आहे.

पहिल्या टी-20 साठी भारताची संभाव्य Playing XI: (Team India Playing XI 1st T20 vs New Zealand)

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ- (Team India Squad vs New Zealand T20)

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (पहिले तीन टी-20), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.

संबंधित बातमी:

Ind vs NZ ODI Series Gautam Gambhir: गौतम गंभीरच्या विरोधात मैदानात नको नको त्या घोषणा; सर्व खेळाडू चक्रावले, विराट कोहलीने काय केलं?, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.