वर्ल्डकपआधी टीम इंडियाला 440 व्होल्टचा धक्का! उपकर्णधारला दुखापत, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला T20I : टीम  इंडियाने वनडे मालिकेतील पराभवाचा बदला घेत न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत दमदार सुरुवात केली. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या लढतीत भारताने न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र नागपूरात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला.

अक्षर पटेलसोबत नेमकं काय घडलं?

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी (21 जानेवारी) झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या डावादरम्यान भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल गंभीररीत्या जखमी झाला. ज्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत मैदान सोडलं लागले. 16व्या षटकात गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. अक्षरने पहिल्या दोन चेंडूवर फक्त तीन धावा दिल्या होत्या. मात्र तिसऱ्या चेंडूवर डॅरिल मिचेलने लेग स्टंपच्या बाहेर येत शॉर्ट ऑफ फुलर चेंडूवर जोरदार फटका मारला. हा चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात अक्षरने डावा हात पुढे केला, पण चेंडू थेट त्यांच्या बोटावर लागून सीमारेषेपलीकडे गेला.

उपकर्णधारला दुखापत, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

चेंडू लागल्यानंतर अक्षर वेदनेने कळवळताना दिसला. कॅमेऱ्यात त्यांची अवस्था पाहून चाहत्यांची आणि टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली. तत्काळ फिजिओ मैदानात आले. तपासणीदरम्यान अक्षरच्या बोटातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना मैदानाबाहेर नेण्यात आले. अक्षर मैदान सोडल्यानंतर सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माकडे चेंडू सोपवला आणि तेव्हाच 16वे षटक पूर्ण होऊ शकले.

वर्ल्डकपआधी टीम इंडियाला 440 व्होल्टचा धक्का!

टी-20 वर्ल्डकप 2026 पूर्वी हा धक्का भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. कारण आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात अक्षर पटेलचा समावेश आहे. त्यांची दुखापत किती गंभीर आहे आणि तो केव्हा मैदानात परतू शकतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे टी-20 वर्ल्डकपच्या सुरुवातीस अवघे तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला असून 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत अक्षरची फिटनेस ही टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

हे ही वाचा –

Abhishek Sharma : एका चुकीमुळे शतक हुकलं! पण अभिषेक शर्माने मोडला गुरू युवराज सिंगचा मोठा रेकॉर्ड…. पाहा Video

आणखी वाचा

Comments are closed.