टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा संघ हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याच्या तयारीत; ICC चे

T20 विश्वचषक 2026: आयसीसी टी-20 वर्ल्डकपचा थरार 7 फ्रेब्रुवारीपासून रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेद्वारे यंदा आयसीसी टी-20 वर्ल्डकपचं (T20 World Cup 2026) आयोजन करण्यात आलं आहे. टी-20 वर्ल्डकपमधील आमचे सामने श्रीलंकेत खेळवा अशी मागणी करणाऱ्या बांगलादेशची आयसीसीनं हकालपट्टी केली आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉकटलंडला वर्ल्ड कपमध्ये स्थान देण्यात आलं. आयसीसीच्या या निर्णयाचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं विरोध करत त्यांनी बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. मात्र, आयसीसीच्या इशाऱ्यानंतर पाकिस्ताननं अखेर त्यांचा संघ जाहीर केला. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे. मात्र याचदरम्यान पाकिस्तान नापाक हरकत करण्याच्या तयारीत आहे. (India vs Pakistan)

विश्वचषकात पाकिस्तानचा सहभाग अद्याप पूर्णपणे निश्चित झालेला नसला तरी, बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानचा संघ संभाव्य कृतींमुळे आयसीसीच्या अडचणी वाढल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की, जर पाकिस्तानने टी-20 वर्ल्डकपच्या स्पर्धेत भाग घेतला तर ते बांगलादेशच्या समर्थनार्थ सर्व खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्यास आयसीसी कोणती कारवाई करणार, नियम काय सांगतात?, याची सध्या चर्चा रंगली आहे. (Pakistan On Team India)

आयसीसीचे नियम काय? (T20 World Cup 2026)

आयसीसीच्या मते, जर एखाद्या खेळाडूने किंवा संघाने पूर्वपरवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय सामन्यात काळी हातावर पट्टी किंवा इतर कोणतेही चिन्ह घातले तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल. असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. 2023 मध्ये, ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान ख्वाजाला परवानगीशिवाय काळी हातावर पट्टी बांधल्याबद्दल आयसीसीने कडक इशारा दिला होता.

पाकिस्तानवर काय कारवाई करता येईल? (ICC On Pakistan)

पाकिस्तान संघाने परवानगीशिवाय हातावर काळी पट्टी बांधल्यास आयसीसी पहिल्यांदा इशारा देऊ शकते. जर नियमांचे पुन्हा उल्लंघन झाले तर खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या फीच्या 25 टक्के पर्यंत दंड होऊ शकतो. काळी पट्टीचा वापर निषेध किंवा शोक व्यक्त करण्यासाठी केला जातो, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते घालणे बेकायदेशीर मानले जाते. आयसीसीच्या कपडे आणि उपकरणांच्या नियमांनुसार खेळाडूंना परवानगीशिवाय कोणताही राजकीय, धार्मिक किंवा वैयक्तिक संदेश प्रदर्शित करण्यास मनाई आहे.

भारताचा पहिला सामना यूएईविरुद्ध- (Ind vs UAE T20 WC)

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारीला एकूण 3 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात, दुसरा स्कॉकटलंड यांच्यात आणि तिसरा भारत आणि अमेरिका यांच्यात होईल. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी कोलकाता किंवा कोलंबो येथे होईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी मुंबईत होईल. अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होईल. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. दोघांमधील पहिली लढत 15 फेब्रुवारी रोजी होईल. विश्वचषकात खेळणारे सर्व 20 संघांना 4 गटात विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात 5 संघ असतील.

संबंधित बातमी:

टी-20 क्रिकेट विश्वचषकाचं बिगुल वाजलं, 7 फेब्रुवारीपासून सुरुवात, रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी

आणखी वाचा

Comments are closed.