29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार; संपूर्ण राज्याचं लक्ष
महाराष्ट्र महानगरपालिका आरक्षण 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रालयाकडं लागलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर या सोडतीला प्रारंभ होणार आहे. 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे दरम्यान आरक्षण सोडतीनंतरच कोणत्या शहरात ओबीसी महिला, खुल्या प्रवर्गातील महिला किंवा अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण असेल, हे स्पष्ट होणार आहे. (Maharashtra Municipal Corporation Reservation 2026)
मुंबईच्या महापौरपदासाठी आज चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार- (BMC Mayor Reservation 2026)
मुंबईच्या महापौरपदासाठी आज चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या वेळी या पदासाठी अनुसूचित जाती महिला आणि खुला प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. त्यामुळे कुठल्या आरक्षणाचे पक्षनिहाय किती नगरसेवक विजयी झाले आहेत, याचा लेखाजोखा राजकीय पक्ष तयार करत आहेत. आरक्षण निश्चित झाल्यानंतर महापौरपदासाठी कुणाला संधी देता येईल, याबाबतच्या हालचालींना वेग येणार आहे. राज्य शासनाच्या विभागामार्फत महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत नगरविकास मंत्रालयात गुरुवारी सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे. या प्रक्रियेकडे सर्वच राजकीय पक्ष, इच्छुक नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार यावर इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=a5B0FhXuLoY
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.