सामना फिरवला अन् रक्तबंबाळ झाला, न्यूझीलंडचा पराभव तिथेच ठरला; पहिल्या टी-20 मधील टर्निंग पॉइंट

भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला T20 टर्निंग पॉइंट: भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेची सुरुवात शानदार विजयाने केली आहे. सलामीवीर अभिषेक शर्माचे झंझावाती 84 धावा आणि रिंकू सिंगच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पाहुण्या संघासमोर विजयासाठी 239 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तर न्यूझीलंडचा संघ 7 गड्यांच्या मोबदल्यात 190 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताने हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

अभिषेक शर्माचे रेकॉर्डब्रेक अर्धशतक, रिंकू सिंगचा फिनिशिंग टच

नागपूरच्या मैदानात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय भारतीय फलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. अभिषेक शर्माने फक्त 35 चेंडूत 84 धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 8 षटकार आणि 5 चौकार लगावले. या झंझावाती खेळीदरम्यान अभिषेकने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला. अभिषेक बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे रिंकू सिंगने आपल्या हाती घेतली. रिंकूने अवघ्या 20 चेंडूत 44 धावांची वेगवान खेळी करत भारताचा स्कोअर 7 बाद 238 पर्यंत पोहोचवला.

सामन्याचा टर्निंग पॉइंट

239 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली होती, मात्र मधल्या फळीत ग्लेन फिलिप्सने भारतीय गोलंदाजांची झोप उडवली होती. फिलिप्सने 40 चेंडूत 78 धावा ठोकल्या. फिलिप्स ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून न्यूझीलंड विजय मिळवेल असे वाटत होते.  मात्र, अक्षर पटेलने भारताला ही महत्त्वाची विकेट मिळवून दिली.

अक्षरच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फिलिप्सने शिवम दुबेकडे झेल दिला आणि त्याची खेळी संपुष्टात आली. जर फिलिप्स खेळपट्टीवर आणखी काही काळ टिकला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. अक्षर पटेलच्या या एका विकेटमुळे भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

अक्षर पटेलने रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

दरम्यान, अक्षर पटेल गंभीररीत्या जखमी झाला. ज्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत मैदान सोडलं लागले. 16व्या षटकात गोलंदाजी करत असताना ही घटना घडली. अक्षरने पहिल्या दोन चेंडूवर फक्त तीन धावा दिल्या होत्या. मात्र तिसऱ्या चेंडूवर डॅरिल मिचेलने लेग स्टंपच्या बाहेर येत शॉर्ट ऑफ फुलर चेंडूवर जोरदार फटका मारला. हा चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात अक्षरने डावा हात पुढे केला, पण चेंडू थेट त्यांच्या बोटावर लागून सीमारेषेपलीकडे गेला. कॅमेऱ्यात त्यांची अवस्था पाहून चाहत्यांची आणि टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली. तत्काळ फिजिओ मैदानात आले. तपासणीदरम्यान अक्षरच्या बोटातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना मैदानाबाहेर नेण्यात आले.  पण त्याआधी त्याने महत्त्वाची विकेट घेऊन सामना फिरवला होता.

हे ही वाचा –

Team India Bad Fielding : हातातून निसटतोय वर्ल्डकप?, न्यूझीलंडविरुद्ध मॅच जिंकली, पण 4 चुकांनी टीम इंडियाची पोलखोल, मोठी कमजोरी पुन्हा उघड

आणखी वाचा

Comments are closed.