गिरीश महाजनांना नडल्या, नाशिकमध्ये कार्यक्रम सुरु असतानाच गोंधळ घातला; कोण आहेत माधवी जाधव?
कोण आहेत माधवी जाधव-गिरीश महाजन: नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचं नाव न घेतल्याने मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या वन कर्मचारी माधवी जाधव (Madhavi Jadhav) आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी केली आहे. दरम्यान वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत पाठिंबा दर्शवला आहे.
नेमकं प्रकरण काय? (Nashik Girish Mahajan)
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही?, असा आक्षेप घेतला. या दोन महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ घातला पोलिसांनी तत्काळ या दोघांना ताब्यात घेऊन सरकार वाडा पोलीस ठाण्यात आणले. घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलीस यासंदर्भात कारवाई करत आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वनरक्षक कर्मचारी महिलांनी केली आहे.
बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही- माधवी जाधव (Madhavi Jadhav Girish Mahajan)
पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतलं नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी, असं माधवी जाधव म्हणाल्या.
कोण आहेत माधवी जाधव? (Who Is Madhavi Jadhav)
माधवी जाधव या शासकीय नोकरी करतात. माधवी जाधव सध्या वन विभागात वनरक्षक पदावर आहेत. 2011 साली माधवी जाधव भरती झाल्या होत्या. सध्या सिन्नर येथे माधवी जाधव कार्यरत आहेत.
गिरीश महाजन काय म्हनले? (गिरीश महाजन माधवी जाधव यांच्यावर)
मला आज खूप वाईट वाटले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी जेवढा पुढाकार घेतो, नेते येतात हार घालून निघून जातात. पण मी आमच्या गावात, तालुक्यात जयंतीमध्ये असतो. मी चाळीस वर्षात एकदा पण असे केले नाही. मी मातंग समाजासाठी, वाल्मिकी समाजासाठी जातो, लग्नात जातो. मी संघाच्या मुशीत वाढलो आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा उभा केला. आता अनवधानाने बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राहिले असेल पण एवढे कशासाठी? हे मला काही समजत नाही, असं मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले.
माधवी जाधव यांचा नाशिकमध्ये राडा, गिरीश महाजनांवर टीका, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.