नाशिकमध्ये ‘हिट अँड रन’ चा थरार; सरकारी अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलानं दोघांना उडवलं, व्हिडीओ स

नाशिक: नाशिक शहरात ‘हिट अँड रन’ ची थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात  ही घटना घडली आहे. एका भरधाव चारचाकी कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक (Nashik Hit and run) दिली. या भीषण अपघातात (Nashik Hit and run) दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (Nashik Hit and run) कैद झाली आहे, तर या घटनेबाबतची धक्कादायक बाब म्हणजे कार चालवणारा चालक अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल .(Nashik Hit and run) करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.(Nashik Hit and run)

नेमकं काय घडलं?

या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात ही हिट अँड रनची .(Nashik Hit and run) घटना घडली आहे. या अपघातामध्ये जखमी झालेले दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारत धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील दोघंही खाली पडले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला, मात्र ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.(Nashik Hit and run)

अपघातातील कारचालक हा शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा

या अपघात प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगात फिरवून संबंधित चारचाकी गाडीचा .(Nashik Hit and run) शोध घेतला. धक्कादायक म्हणजे, हा अपघात करणारा मुलगा अल्पवयीन असून तो शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. चार चाकी चालवणारा अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.(Nashik Hit and run)

घटनेचा जो सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणाऱ्या पालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नये असं म्हणत संताप व्यक्त केला जात आहे, या घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.(Nashik Hit and run)

आणखी वाचा

Comments are closed.