बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून लैंगिक शोषण, जमाव संतप्त

ठाणे : बदलापूर पश्चिम परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतत असताना स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या व्हॅन चालकानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे पुन्हा एकदा बदलापूर हादरलं आहे.

सदरची चिमुकली ही नेहमीप्रमाणे शाळेतून स्कूल व्हॅन मधून घरी येत होती. त्याच व्हॅन चालकाने तिच्यावर अत्याचार केला. घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. आरोपीने चिमुकलीला मारहाण केल्याचे तसेच केलेल्या कृत्याची माहितीही तिने पालकांना दिली.

ही घटना समजतात संतप्त पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित प्रकरणातील चिमुकलीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.

Badlapur School  Girl Sexual Abuse Case : जमाव संतप्त, व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह त्या स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे बदलापुरातील वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे.

या आधीही अशीच एक घटना बदलापुरात घडली होती. एका शाळेत चिमुकलीचे लैंगिक शोषण करण्यात आलं होतं. त्यावेळी बदलापूरमध्ये मोठं आंदोलनही झालं होतं. त्यानंतल पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा नोंदवला होता. नंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला होता.

या प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल होताच हे दोघे फरार झाले होते. पण नंतर ते पोलिसांसमोर हजर झाले आणि न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. बदलापूरमधील त्या आठवणी ताज्या असतानाच आता पुन्हा एकदा तशा प्रकारची ही घटना घडल्याने लोकांमधून मात्र संताप्त व्यक्त होत आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.