चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी विजय वडेट्टीवारांचे उद्धव ठाकरेंना साकडं

चंद्रपूर वार्ता: चंद्रपूर महापालिकेमध्ये (Chandrapur Municipal Corporation) काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay  Wadettiwar) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये जवळ जवळ ३० मिटी चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे सहा नगरसेवक निवडून आलेले असताना या नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, यासाठी उद्धव ठाकरे सोबत विजय वडेट्टीवार यांनी चर्चा केली असल्याची माहिती आहे. दरम्यान या भेटी बाबत स्वतः विजय वडेट्टीवार यांनी माहिती देत अभिप्राय दिली आहे.

आम्ही अर्धा तास चर्चा केली आणि चंद्रपूर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता यावी, ही विनंती मी उद्धव ठाकरेंना केलीहे. उद्धव ठाकरे हे देखील सकारात्मक आहेत आणि 100% त्यांना सत्ता व्हावी, अशी इच्छा आहे. महापौर पद अडीच वर्षासाठी हवं असेल तर तयारी ठेवली पाहिजे आणि स्टँडिंग देखील अडीच वर्ष असावं, ही इच्छा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. दरम्यान. याबाबत मी प्रदेशाध्यक्षसोबत चर्चा करेल आणि शेवटचा निर्णय घेऊ, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar: अडीच वर्ष महापौर करावं असं ते बोलले, त्याला आमची अडचण नाही

चंद्रपूर महापालिकेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. इथेही एकत्र आलो तर मजबुतीने कामं करू. यातून चांगलं घडेल असं वाटतं. अडीच वर्ष महापौर करावं असं ते बोलले, त्याला आमची अडचण नाही. संख्याबळ काठावर असून चालत नाही. मजबूत संख्याबळ असेल तरं 5 वर्ष सत्तेत कामं करता येईल. असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. मी प्रदेशाध्यक्ष यांच्या कानावर टाकतोय. महापौर होत असताना संदीप पडले त्यांच्याशी चर्चा करून दोघांनी समन्वय साधून एक नावं निवडघ्या पाहिजे. त्या खुर्ची वर बसणाऱ्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं कामं ठेवलं पाहिजे. सोबतच अडीच वर्ष आम्हाला पद दिलं पाहिजे, ही विनंती केली असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत आमचा निर्णय होईल, असेहे त्यांनी सांगितलंहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.