ओळख पटवण्यासाठी आरोपीला शाळेत बोलवलं, ड्रायव्हरला पाहून मुलगी घाबरली, बदलापूरमध्ये काय घडलं?

बदलापूर क्राईम न्यूज बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत शाळेच्या बसमध्ये हे कृत्य घडले. बदलापूर पश्चिमेला असणाऱ्या नामांकित खासगी शाळेत (School) हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे बदलापूरमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे मुलीचे पालक सुरुवातीला शाळेत गेले तेव्हा मुख्याधापिकेने बस चालकाची बाजू घेतली. यापूर्वीही बदलापूरमध्ये (Badlapur news) झालेल्या लैंगिक अत्याचार (Sexual Assault) प्रकरणावर शाळा प्रशासनाने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तसाच प्रकार यावेळीही घडला. शाळेच्या मुख्याधापिकेने दाद न दिल्यामुळे पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली.  त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चालकाला अटक केली. (Crime news)

प्राथमिक माहितीनुसार, ज्या लहान मुलीसोबत चालकाने दृष्कृत्य केले ती नर्सरीत शिकत होती. मुलीचे पालक तिला घेऊन शाळेत गेले त्यावेळी मुख्याधापिकेने बस ड्रायव्हरला शाळेत बोलावून घेतले. बस चालक शाळेत आल्यानंतर मुख्याधापिकांच्या केबिनमध्ये शिरला तेव्हा तिथे असलेली चार वर्षांची चिमुरडी घाबरली. ती आपल्या पालकांच्या पाठीमागे लपली. यावरुन पालकांना मुलीच्या मनस्थितीचा अंदाज आला आणि त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात राज्य सरकारने निर्देश देऊनही बसमध्ये महिला अटेंडंट नसल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे आता बस चालकासह शाळेवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Badlapur news: बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?

बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. स्कूल बसच्या चालकाने आपल्या  गुप्तांगाला हात लावल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.  पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केलाय.

दरम्यान हा प्रकार समजताच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी बदलापूर पश्चिमेकडील पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तसंच राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवणकर यांनी स्कूल व्हॅनवर दगड भिरकावला. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. काल मध्यरात्री बदलापूर अत्याचार प्रकरणात तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आली होती. या टीमने स्कूल व्हॅनची तपासणी करुन पुरावे गोळा गेले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणाच्या तपासात पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=98XMCcgPkMg

आणखी वाचा

साताऱ्यातील लव्ह ट्रँगलची रक्तरंजित कहाणी, महिलेने EX अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला मारलं, तुकडे शेततळ्यात फेकले

आणखी वाचा

Comments are closed.