OYO हॉटेलमध्ये वादाची ठिणगी पडली, प्रियकराने प्रेयसीला चाकूने वार करत संपवलं अन्…; नागपूर हाद

नागपूर क्राईम न्यूज : नागपूरच्या (Nagpur) कळमेश्वर रोडवरील फेटरी गाव परिसरात असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये (Oye Hotel) प्रेमप्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुचिता भांगे असे मृत तरुणीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुचिता भांगे आणि तिचा प्रियकर हे दोघे ओयो हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसक कृत्यात झाले आणि संतापाच्या भरात प्रियकराने चाकूने रुचिताच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात रुचिता गंभीर जखमी झाली असून, काही वेळातच तिचा मृत्यू झाला.

Nagpur Crime News: पहिल्या मजल्यावरून उडी मारत प्रियकराने काढला पळ

हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हॉटेलमधील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेल्या आरोपी प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. प्रेमप्रकरणातून घडलेल्या या हत्येने नागपूर शहर हादरून गेले आहे.

Nagpur Crime News: एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीची हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोधणी परिसरात एकतर्फी प्रेमातून २३ वर्षीय तरुणी प्राची खापेकर हिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित शेजारी शेखर ढोरे (वय ३८) याने तरुणीचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह फॅनला लटकावून आत्महत्येचा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. सुरुवातीला आत्महत्येचा संशय होता, मात्र शवविच्छेदन अहवालातून खुनाचा प्रकार स्पष्ट झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: नपुंसकत्व लपवून मुलाचा थाटामाटात विवाह, शरीरसंबंध टाळण्यासाठी नवसाचं नाटक; खरं कळताच मुलीच्या पायाखालची वाळू सरकली; छ. संभाजीनगरमधील घटना

Mumbai Crime News: डोक्यात टपली मारून केसाला स्पर्श, विरोध करताच खुर्ची फेकली अन्….; मुख्याध्यापकाकडून सहशिक्षिकेचा विनयभंग, मुंबईतील संतापजनक घटना

आणखी वाचा

Comments are closed.