ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर, पक्षश्रेष्ठींचा आदेश न जुमानाऱ्यांवर वंचितकडून कारवाई
Chandrapur Mayor Election 2026 : गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Municipal Corporation) मंगळवारी ठाकरे गटाने अचानक पाठिंबा दिल्यामुळे भाजपने (BJP) सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला. दरम्यानचंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या झालेल्या अनपेक्षित विजयानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे.
चंद्रपूरच्या महापौर पदासाठी कालावधी (१० फेब्रुवारी) झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उबाठाने थेट भाजपसोबत युती केली, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ने तटस्थ राहून कोणालाही मतदान केलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या महापौर पदाच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला. त्यामुळे बहुजन वंचित आघाडीने तातडीने कारवाई करत वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांची पदावरून गच्छंती केली आहे.
Vanchit Bahujan Aaghadi : वंचितच्या दोन नगरसेवकांवरील कारवाईबाबत संभ्रम
सोबतच त्यांनी केलेल्या सर्व नियुक्तींना देखील स्थगिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अनुपस्थित राहण्याची भूमिका घेतली. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही नगरसेवकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने काँग्रेसचा अवघ्या एका मताने पराभव झाला. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत पक्षाने शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्यावर कारवाई केली. मात्र अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणाऱ्या वंचितच्या दोन नगरसेवकांवर पक्ष काय कारवाई करणार याबाबत मात्र संभ्रम आहे.
Harshvardhan Sapkal: चंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झाला आहे
दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अभिप्राय देतांना सांगितलं तेचंद्रपुरात नक्कीच मोठा घोडेबाजार झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा 1000 कोटीचा बंगला हा चर्चेचा विषय आहे. महापौर बनवण्याकरता त्यांनी तेवढेच पत्ते विकत घेतलेले आहेत. यात मोठा घोडेबाजार झालेला आहे. अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत असायला हवी होती, हे तेवढेच खरं आहे. चंद्रपूरच्या दोन्ही नेत्यांना आम्ही एकत्रित येण्यासाठी पुढाकार घेतला. आमच्या पक्षात कुठेही फाटाफूट झाली नाही. यात उबाठाने भाजपला पाठिंबा दिला. सुधीर मुनगंटीवार यांनी जसा बंगला बांधला, तशाच पद्धतीने आज त्यांनी महापौर बसवला आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय.
चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)
एकूण नगरसेवक 66
काँग्रेस – 27
काँग्रेसने जनविकास सेनेला पाठिंबा दिला – ३
भाजप – 23
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6
वंचित – 2
बसपा – १
शिवसेना (शिंदे गट) – 1
अपक्ष – 2
एमआयएम – 1
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.