मतदान केंद्रावर लहान मुलानं EVM बटन दाबलं, निवडणूक आयोगाची कारवाई, कर्मचाऱ्यांचं निलंबन

सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक 2026 : सोलापूर जिल्ह्यातील फोंडशिरस येथे मतदान करताना लहान मुलांना सोबत नेल्याप्रकरणी निवडणूक आयोगा३ (राज्य निवडणूक आयोग) कारवाईचा बडगा उगारला आहे. लहान मुलाला सोबत नेत मतदान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील (Arjunsinh Mohite Patil) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांनाहे निलंबित करण्यास निवडणूक आयोगाची मान्यता देण्यात आली आहे. (सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक 2026)

दरम्याननिवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे केंद्राध्यक्ष अण्णा बुद्धे आणि पोलिस कर्मचारी गजानन राऊत या दोघांना निलंबित करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी देण्यात आली आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना त्यांच्या मुलाला पोलिंग बूथपर्यंत घेऊन जाण्यास परावृत्त न केल्याने शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे.तसेच अर्जुनसिंह मोहिते-पाटील (Arjunsinh Mohite Patil) यांच्यावर दाखल गुन्ह्याचे सध्यस्थितीचे अहवाल सादर करण्याच्या देखील माहिती आयोगाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय? (सोलापूर झेडपी निवडणूक 2026)

मतदानाच्या दिवशी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी, मतदानाचा अधिकार नसलेल्या त्यांच्या मुलानेच ईव्हीएमचे बटन दाबल्याचे व्हिडिओत दिसून आले. त्यावरुन, वाद निर्माण झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पोलिस कर्मचारी, मतदान केंद्राध्यक्ष यांची चूक आहे, असे सांगून संबंधित मतदार, पोलिस आणि केंद्राध्यक्षांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले गेलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शनिवारी दोन ते तीन ठिकाणी नियमांचे उल्लघंन झाल्याचे पुढे आले होतं. यात मोहोळमध्ये एका हॉटेलबाहेर ईव्हीएम आढळून आली आहेत. त्या प्रकरणी तिघांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. झोनल अधिकारी, त्यांचे सहायक आणि वाहनचालक यांची चूक असल्याचे दिसून आले आहे.

अशातच आता लहान मुलांना सोबत नेल्याप्रकरणी निवडणूक आयोगाद्वारे कारवाईचा बडगा उगारला आहे. लहान मुलाला सोबत नेत मतदान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांनाहे निलंबित करण्यास निवडणूक आयोगाची मान्यता देण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Solapur ZP Election : मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर आढळल्याप्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल; दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका

आणखी वाचा

Comments are closed.