पोलीस होण्यासाठी धावत राहिला, पण स्वप्नांची शर्यत अर्धवट संपली; तरुणाचा मैदानावरच अखेरचा श्वास
बीड वार्ता: बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) प्रक्रिये दरम्यान एका उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलंय. दीपक भास्कर व्हावळ असे या उमेदवार तरुणाचे नाव असून अस्वस्थपणामुळे मृत्यू झाल्याचं कारण सांगितले जात आहे. बीड जिल्हा पोलीस दलात (Beed Police Recruitment) 174 पदांसाठी 8134 उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी आहेत. आज पहाटेपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. दुपारच्या सुमारास मैदानी चाचणी सुरू असताना या उमेदवाराचा मैदानावरच दुर्दैवी मृत्यू झालाहे. अचानक झालेल्या या घटनेनं अनेकांनाही फक्त जबर धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (बीड पोलीस भरती अपघाताची बातमी)
दरम्यानशवविच्छेदनासाठी उमेदवाराचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण कळू शकणार आहे. परंतु अनेक स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते.
Beed Police Recruitment : 174 पदांसाठी आठ हजारांहून अधिक उमेदवार, अत्याधुनिक फोटो फिनिश तंत्रज्ञानाचा वापआणि
बीड जिल्हा पोलिस दलात रिक्त 174 पदांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. 18 तारखेपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार असून आठ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पारदर्शी करिता जिल्हा पोलीस दल वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत.
अशातचया भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये धावण्याच्या चाचणीकरिता फोटो फिनीश हे जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आलेले आहे. याबरोबरच सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हीडीओ चित्रीकरण केले जात आहे. तसेच एखाद्या उमेदवाराने उत्तेजक द्रव घेतले आहे का, हे तपासणी करण्यासाठी रक्त चाचणीही करण्यात येतेय.
Beed Crime : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; दोन महिन्यांपासून पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत
मागील दोन महिन्यांपासून फुस लावून पळविण्यात आलेली मुलगी पोलिसांनी सापडून द्यावी. या मागणीसाठी एक कुटुंब बीड पोलिसांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र पोलिसांनी पीडित कुटुंबालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 रोजी एका तरुणाने अल्पवयीन मुलगी फुस लावून पळविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याचाच पाठपुरावा पीडित कुटुंबाकडून केला जातो आहे. परंतु, पोलिसांनी फिर्यादी पीडित कुटुंबाला मारहाण करून गुन्हा नोंदविल्याचा प्रकार समोर आला.
दरम्यानयाप्रकरणी पीडित कुटुंबाने न्याय देण्याची मागणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. घडलेल्या सर्व प्रकाराची रीतसर तक्रार पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली. यापूर्वी देखील न्याय मिळत नसल्याने पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र स्थानिक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबाचा आहे.
दरम्यान आमची मुलगी जिवंत आहे की नाही? किमान एवढं तरी दाखवावं.. अशी आर्त हाक मुलीच्या आईची आहे. सर्वसामान्य हे कुटुंब असून मागील दोन महिन्यांपासून न्याय मिळण्याच्या अपेक्षेने पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालेल्या चित्रावरून चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.