धक्कादायक! शाळकरी मुलीचे बोट कापत गळ्यातील सोन्याची लॉकेट चोरली, मालाडमध्ये भीतीचं वातावरण
मुंबई क्राईम न्यूज : मुंबईच्या मालाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय शाळकरी मुलीची सोन्याची लॉकेट कापून नेल्याची धक्कादाय घटना घडली आहे. मालाड पूर्वेत कुरार व्हिलेज परिसरात क्रांतीनगरमध्ये सहा वर्षीय शाळकरी मुलगी शाळेत जात असताना ही घटना घडली आहे. चाकूने सोन्याच्या लॉकेट कापत असताना शाळकरी मुलीने विरोध केला म्हणून आरोपीने चक्क मुलीचे बोट कापले आहे. मालाड क्रांतीनगर परिसरात भर दिवसा शाळकरी मुलीवर हल्ला करून आरोपींने हाताचा बोट कापून चोरी केल्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुलीच्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करुन 16 वर्षाच्या आरोपीला अटक
याप्रकरणी कुरार पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करुन 16 वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे. नशा करण्यासाठी आरोपीने मुलीचा सोन्याचा लॉकेट चोरी केली आहे. भर दिवसा शाळकरी मुलीवर हल्ला करुन सोना चोरी केल्यामुळं मालाड क्रांतीनगर परिसरात पालकांमध्ये मोठा भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या कुरार पोलिसांनी आरोपीला अटक करून यापूर्वी आरोपींनी अशा पद्धतीने किती लोकांचा सोना आणि पैसे चोरी केली आहे. त्यासोबत यामध्ये आणखी कोण त्याच्या साथीदार आहेत का या संदर्भात सखोल चौकशी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Pune Crime News: पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी; दुधवाल्यानेच मारला डल्ला, डिजीटल लॉकचा पासवर्ड सापडला अन्…
आणखी वाचा
Comments are closed.