मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई, लाच घेताना अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लार्कला अटक

मुंबई : मंत्रालयात एसीबीनं (Anti Corruption Bureau) मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्कला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र ढेरंगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करुन देण्यासाठी मागितली 50 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (हर्षवर्धन सपकाळ) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मंत्रालयात खळबळ

मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्कला लाच घेताना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करुन देण्यासाठी क्लर्कने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी शिरवळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते

तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी शिरवळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतलं. तपास झाल्यानंतर मग या संबंधित क्लर्क ला ताब्यात घेऊन गेले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आलं.

महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू

दरम्यान, या घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावे, भ्रष्टयुती असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nandurbar Bribe : 8 लाखांची लाच घेताना PWD उपअभियंता रंगेहात अटक; ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी मागितले पैसे

आणखी वाचा

Comments are closed.