IND vs PAK मॅचवरुन बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता खवळला; म्हणाला, ‘पाकिस्ताननं जिवंतपणी बॉम्ब..’

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी भारत विरुद्ध पाक सामन्यावर आक्षेप घेतला: टी20 वर्ल्डकपच्या (ICC T20 World Cup) महारणसंग्रामात आज टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) आमने-सामने येणार आहेत. क्रिकेटच्या मैदानातली कोणतीही स्पर्धा असो सारेच भारत आणि पाकिस्तान विरूद्धच्या क्रिकेट सामन्याची आतुरतेनं वाट पाहत असतात. पण, बॉलिवूडच्या (Bollywood News) सुप्रसिद्ध फिल्ममेकरनं इंडिया वर्सेज पाकिस्तानच्या सामन्यावर आक्षेप घेतला आहे. सुप्रसिद्ध फिल्ममेकर अशोक पंडित (Filmmaker Ashoke Pandit) यांनी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मनातला राग बोलून दाखवला.

मुंबईतील (Mumbai News) बीएमसीनं (BMC) आयोजित केलेल्या वार्षिक पुष्प उत्सव यंदा मुंबईतील अंधेरी परिसरातील पुष्पक नर्सरी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, चित्रपट निर्माते अशोक पंडित, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम आणि बीएमसी आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यात फिल्ममेकरची रिअॅक्शन

15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल सिनेनिर्माते म्हणाले की, “एकीकडे, आम्ही पुलवामा हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करतोय आणि दुसरीकडे, आम्ही त्याच देशासोबत सामना खेळतोय. मी म्हणतो की, जोपर्यंत तो देश शुद्धीवर येत नाही, दहशतवाद आणि रक्तपात थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्याशी कोणताही व्यापार, खेळ आणि कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवूच नयेत. त्याचं अस्तित्व हिंसाचारावर आधारित आहे. ते एक दहशतवादी राष्ट्र आहे आणि संपूर्ण जगानं आणि संयुक्त राष्ट्रांनी ते  घोषित केलं पाहिजे…”

अशोक पंडीत यांना पुलवामा हल्ल्याची आठवण

पुलवामा हल्ल्याला जवळपास सात वर्ष लोटली असली तरीसुद्धा संपूर्ण देशाला पाकिस्ताननं दिलेली भळभळती जखम अजूनही ओलीच आहे. याबाबत आयएएनएसशी बोलताना फिल्ममेकर अशोक पंडित यांनी सांगितलं की, “मी स्वतः काश्मीरचा आहे आणि मला दहशतवादाचा सामना करावा लागलेला. आमच्या समुदायाला नरसंहाराचा सामना करावा लागला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक जीव गेलेत, विशेषतः पुलवामासारख्या हल्ल्यांमध्ये, जे आमच्या आठवणींमधून कधीही पुसले जाऊ शकत नाहीत. पाकिस्ताननं आपल्या कित्येक सैनिकांना जिवंतपणी बॉम्ब लावून उडवलंय आणि ज्यांनी त्यांचे कुटुंबीय गमावलेत आणि आमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व सैनिक आणि कर्मचाऱ्यांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो… मी धैर्याला सलाम करतो कारण त्यामुळेच आपण सुरक्षित आहोत…”

OTT वर टीम इंडिया-पाकिस्तान सामना कुठे पाहाल?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होईल, टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल. तुम्ही सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+ हॉटस्टार अॅपवर देखील पाहू शकता, ज्यावर मोफत स्ट्रीमिंग असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

फेब्रुवारीला रिलीज झालेली ‘ही’ फिल्म पाहून करण जोहरनं घेतला BP च्या औषधांचा एक्स्ट्रा डोस; BO वर ओपनिंग फक्त 55 लाख

आणखी वाचा

Comments are closed.