टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कशाला खेळता? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना
भारत विरुद्ध पाक सामना संजय राऊत: देवेंद्र फडणवीस हे मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यावरुन टीका करतात. मात्र, तेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) टिपू सुलतानाला (Tipu Sultan) नायक आणि महान योद्धा मानणाऱ्या पाकिस्ताशी भारताने क्रिकेट (Ind Vs Pak match) खेळण्याचा धिक्कार का करत नाहीत, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (T 20 World Cup)
पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान नायक आहे. मग त्याला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबत भारत क्रिकेट खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्कार केला पाहिजे. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानाचे पुतळे आहेत, अभ्यासक्रमात त्याचे धडे आहेत. तो पाकिस्तानचा नायक आणि योद्धा आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपची राष्ट्रभक्तीची उर्मी उचंबळून वर आली पाहिजे. आम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा धिक्कार करतो, असे फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी सांगायला पाहिजे. पण भाजप तसे करणार नाही, कारण भाजप ढोंगी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटमधून सगळ्यांना पैसे मिळतात. हे पैसे शेकडो कोटींच्या घरात आहेत. भारत आणि पाकिस्तान सामन्यावर सर्वाधिक जुगार खेळला जातो. याच बेटिंगमधून पाकिस्तानला 25 हजार कोटी मिळाले. यामधील काही वाटा सरकारलाही मिळतो. हाच पैसा मग पुलवामा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जातो. हे पाप भाजपचं आहे. भारत-पाक क्रिकेट सामन्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची ढोंग उघडी पडली आहेत. एकतरी भाजपवाला सांगतोय का, पाकिस्तानसोबत खेळू नका. जो पाकिस्तान टिपू सुलतानाला नायक मानतो, त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट कसं खेळू शकता? मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाचा फोटो हटवणे ही किरकोळ गोष्ट आहे. मुळात भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळतोच का, हा प्रश्न आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut: हर्षवर्धन सपकाळांकडून शिवाजी महाराज-टिपू सुलतानाची तुलना, संजय राऊत म्हणाले…
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धा असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप प्रचंड आक्रमक झाला आहे. याबाबत विचारणा केल्यानंतर संजय राऊत यांनी म्हटले की, टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस यांच्याशी आम्ही याबाबत वेगळी चर्चा करु. पण मुळात भारत पाकिस्तानशी क्रिकेट खेळतोच का, हा मुद्दा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते, हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वादाचा भडका
आणखी वाचा
Comments are closed.