जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादावरून काँग्रेस अन् ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, भर चौकात सिनेस्टाईल

धाराशिव काँग्रेस विरुद्ध शिवसेना UBT: जिल्हा परिषद निवडणुकीच्या (ZP Election 2026) वादावरून धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब (Kalamb) शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस (Congress) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांमध्ये भर चौकात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीतील डीकसळ गटाच्या वादातून हा संघर्ष उफाळून आला. वादाचे रूपांतर क्षणातच थेट मारहाणीत झाले. विशेष म्हणजे, पोलिसांची उपस्थिती असतानाही दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Dharashiv Congress vs Shiv Sena UBT: 6 कार्यकर्ते गंभीर जखमी

या मारहाणीत दोन्ही गटांतील एकूण 6 कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांसमोरच घडलेल्या या घटनेनंतरही अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, ही बाब चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी हिंसक घटना घडल्याने कळंब शहरातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे.

Dharashiv ZP: धाराशिव ZP अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला

दरम्यान, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच–अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्याचा प्रस्ताव शिवसेनेने भाजपसमोर मांडला आहे. प्रस्तावानुसार अडीच वर्षे भाजपकडे अध्यक्षपद, तर उर्वरित अडीच वर्षे शिवसेनेकडे राहील. भाजपचा अध्यक्ष असताना शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि शिवसेनेचा अध्यक्ष असताना भाजपचा उपाध्यक्ष राहणार आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादीला सभापती पद देऊन सत्तेत सामावून घेण्याचीही तयारी आहे. या प्रस्तावावर राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली. सत्ता स्थापनेबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेणार असून, दोघांची आज बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदांतील सत्ता समीकरणांवरून धाराशिवमधील निर्णय ठरणार आहे.

धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल- (Dharashiv ZP Election 2026)

एकूण जागा- 55
भाजप – 19
शिवसेना (शिंदे गट) – 15
ठाकरे गट (शिवसेना उत्तर प्रदेश) – 7
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)-6
काँग्रेस- 3
अपक्ष – 3
अपक्ष (भाजप पुरस्कृत) – 1
समाजवादी पक्ष – १

आणखी वाचा

Dharashiv ZP: धाराशिव जिल्हा परिषदेत शिंदे-ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार नाहीत; शिंदे गटाच्या नेत्याने ‘ती’ चर्चा फेटाळली

आणखी वाचा

Comments are closed.