संतापजनक! रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहून नजर फिरली, दुचाकीस्वाराने मागून येत केला छातीला स्पर
अकोला गुन्हे: राज्यात गुन्हेगारी घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. अकोला शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या दोन मुलींमधील एका मुलीची दुचाकीवरून आलेल्या तरुणाने छेड काढल्याची घटना उघडकीस आली असून संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Akola Crime News)
ही घटना अकोला शहरातील जवाहर नगर परिसरात घडली. हा भाग कोचिंग क्लासेससाठी ओळखला जातो. शहरासह ग्रामीण भागातून अनेक मुली येथे शिकवणीसाठी येत असतात. त्यामुळे या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
Akola Crime:नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार अकोला शहरातील जवाहर नगर परिसरात एका मुलीचा छेड काढल्याचा नवा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या दोन मुलींपैकी एका मुलीची खुलेआम तरुणाने छेड काढत पसार झालाय.. दुचाकीस्वाराने पाठीमागून येत मुलीच्या छातीला स्पर्श केलाय आणि तिच्या गळ्यातील आयडीकार्ड अर्थातच ओळखपत्र घेऊन दुचाकीने पळाला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीय. अकोला शहरातील कोचिंग क्लासेस म्हणून प्रसिद्ध असलेला परिसर जवाहर नगर परिसरात ही घटना घडली आहे.. शहरासह ग्रामीण भागातून मुली शिकवणी वर्गासाठी या परिसरात येत असतात. त्यामुळं परिसरात मोठ्या प्रमाणात दामिनी पथकाची गस्ती वाढवावी, अशी मागणी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी केलीय ..
दरम्यान, या परिसरात यापूर्वीही मुलींच्या छेडछाडीच्या घटना घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. अकोल्याचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी या भागात दामिनी पथकाची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
लग्नाच्या मिरणवूकीत नंग्या तलवारी फिरवल्या
काही दिवसांपूर्वी अकोल्यात लग्नाच्या मिरणवूकीत नंग्या तलवार फिरवल्याचा धक्कादेणारा प्रकार समोर आला होता. डीजेच्या तालावर काही तरुण या ठिकाणी नंग्या तलवारी फिरवत होते, याचं वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका लहान मुलाच्या डोक्याला ही तलवार लागली. यात मुलाच्या डोक्याला मोठा मार लागला. तर त्याच्या डोक्याला 5 टाके लागलेमुलावर बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. या प्रकरणी बाळापूर शहर पोघेतलास पुढील तपास करतायेत. दरम्यान, एखाद्या कार्यक्रमात म्यानातून तलावर उपसली तरी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होते.
आणखी वाचा
Comments are closed.