खाली पडलेलं विमान, लोकांची गर्दी, इतक्यात एक भयानक स्फोट अन्… अजित पवारांच्या अपघातानंतरचा ‘त
अजित पवार विमान अपघात व्हिडिओ: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या या विमान दुर्घटनेबाबत (Plane Crash) अनेकांकडून सध्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात असतानाच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. बारामती तालुक्यातील गोजुबाबी अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान कोसळले होते. तेथील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांचे विमान खाली कोसळल्यानंतर त्याचा स्फोट झाला आणि त्याचे तुकडे सर्वत्र विखुरले होते. स्फोटाचा आवाज ऐकून गोजुबाबी येथील गावकरी घटनास्थळी येऊन पोहोचले. हे गावकरी जळणाऱ्या विमानाभोवती जमले असतानाच आणखी एक स्फोट झाला. हा स्फोटाचा आवाज ऐकून सगळे गावकरी घाबरले आणि पळत सुटले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ajit Pawar Latest news)
दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी 28 जानेवारीला सकाळी बारामती येथे येत होते. अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले होते. हे विमान साधारण 8.45 च्या सुमारास बारामतीच्या आसपास पोहोचले. हे विमान बारामती विमानतळाच्या रनवेवर उतरण्यापूर्वी बाजूच्या शेतात जाऊन कोसळले. खाली कोसळल्यानंतर या विमानाचा स्फोट झाला होता. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या या विमान दुर्घटनेची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. या विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आला होता. या सगळ्यामागे कट असू शकतो, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला होता.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.