श्रीकांत शिंदे अन् नाईक यांच्यातील वाकयुद्धावरून अंबादास दानवेंनी डिवचलं; म्हणाले, ‘पाणी आडवा..

राजदूत दानवे छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात ज्या प्रमाणे योजना आहे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ तसं यांचं एकमेकांची जिरविण्याची प्रयत्न सुरू आहे, गणेश नाईक (Ganesh Naik) योग्यच बोलले, अस मला वाटबस्स, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या वादावर भाष्य करत टीका केली आहे. (गणेश नाईक विरुद्ध श्रीकांत शिंदे)

Ambadas Danve : टिपू सुलतानवर प्रेम असणारी अवलाद देशात अजूनही जिवंत. हे तितकच सत्य

खरंतर चर्चा होऊ शकते. मात्र हाणामारी करणे चूक आहे, भारतीय जनता पार्टी देशात आणि राज्यात सत्तेत आहे, अशा पद्धतीने काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे चूक आहे. जो फोटो मालेगावला लागला त्यावरून हे सुरू झाले आहे. टिपू सुलतान इंग्रजांविरोधात लढले हे सत्य आहे. मात्र अत्याचारही केलेत्यामुळे, याचे इतिहासात पुरावे आहेत. टिपू सुलतानच्या नावाने महामार्गाला नाव द्यावे, हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा ठराव मुंबई महापालिकेत होता. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रपती राहून गेलेले रामनाथ कोविंद यांनी शहादत त्यांची झाली, अशा पद्धतीचे वक्तव्य केलं होतं, अब्दुल कलाम, आझाद यांनी देखील असे वक्तव्य केले होते. मात्र त्यांना राष्ट्रपती भाजपने केले. भाजप दुटप्पी आहे, राज्यातील इतर महत्वाचे विषय आहेत, शेतकऱ्यांचा विषय आहे, महागाईचा विषय आहे, मंत्रालयात लाच घेतली जाते, अजित दादा यांच्या मृत्यूच गूढ कायम आहे, हे लोकांना वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत टीका केली आहे.

टिपू सुलतान कुणाला आवडतो, ना आवडतो हा, ज्याचा त्याचा विषय आहे. त्याने हिंदूंवर अत्याचार केले हे सत्य आहे. मात्र त्याच्यावर प्रेम असणारी अवलाद देशात अजूनही जिवंत आहे, ही तितकच सत्य आहे. फोटो लावणं हा जर त्याचा वैयक्तिक विषय आहे. भाजपने देखील जिनाचा फोटो लावला होता. असेही अंबादास दानवे म्हणाले.

महाराज आणि टिपू सुलतानाची बरोबरी नाही, स्वतःच्या बळावर महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं, शिवाजी महाराज यांनी महिलांचा सन्मान केला, त्यामुळे बरोबरी होऊच शकत नाही. भाजप दुटप्पीपणा करते, टिपू सुलतानच्या विचारांचे समर्थन नाही होऊ शकत, एकीकडे मार्गाला टिपूच नाव देत आणि दुसरीकडे विरोध करते, काँग्रेसच्या कार्यावर हल्ला करते अशी टीकाहे अंबादास दानवे यांनी भाजपवर केली आहे.

अंबादास दानवे तुषार भोसले: तुषार भोसले कोण शंकराचार्य लागून गेलाहे च्या?

मंदिर असो मशीद असो हे सर्व सार्वजनिक ठिकाण आहे, तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का? असा प्रश्नहे अंबादास दानवे यांनी केला आहे. एखादा मुस्लिम माणूस मंदिरात येऊन देवांची पूजा करत असेल तर त्याचे स्वागत करावे, हिंदू धर्म अख्खे विश्व माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे. तर अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगावंचार लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करू नये. सरकारमध्ये तुम्ही आहात, आता अधिवेशन आहे तिथे बोलले पाहिजे. असेही ते म्हणाले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.